ETV Bharat / city

ज्ञानदेव वानखडे यांच्याकडून नवाब मलिकांवर मानहानीची तक्रार दाखल - समीर वानखडे

समीर वानखेडे यांच्या परिवाराकडून आता नवाब मलिक यांच्यावर ओशिवरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली आहे. याअगोदर नवाब मलिक यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीची याचिका समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखडे यांनी दाखल केली होती यावर आज नवाब मलिक यांना आपले मत न्यायालयासमोर मांडायचे आहे.

ज्ञानदेव वानखडे
ज्ञानदेव वानखडे
author img

By

Published : Nov 9, 2021, 9:42 AM IST

मुंबई - आर्यन खान प्रकरणी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर दररोज वेगवेगळे आरोप करून घेरणारे महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक आता कायदेशीर लढाईत अडकल्याचे दिसत आहे. समीर वानखेडे यांच्या परिवाराकडून आता नवाब मलिक यांच्यावर ओशिवरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली आहे. या अगोदर नवाब मलिक यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीची याचिका समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखडे यांनी दाखल केली होती यावर आज नवाब मलिक यांना आपले मत न्यायालयासमोर मांडायचे आहे.

नवाब मलिकांवर मानहानीची तक्रार दाखल
नवाब मलिकांवर मानहानीची तक्रार दाखल

एनसीबी अधिकारी समीर वानखेडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एसी-एसटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली असून एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. याआधी वानखेडे कुटुंबीयांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला असून त्यावर त्यांना आज मंगळवारी उत्तर दाखल करायचे आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी ओशिवारा सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत आरोप केल्याप्रकरणी महाराष्ट्र मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी कुटुंबाच्या जातीबाबत खोटे आरोप केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मलिक यांच्यावर एफआयआर नोंदवावा अशी वानखेडे कुटुंबीयांची मागणी आहे.

नवाब मलिकांवर मानहानीची तक्रार दाखल
नवाब मलिकांवर मानहानीची तक्रार दाखल

समीर वानखेडे सहपरिवार राज्यपालांची भेट

समीर वानखेडे यांच्यावर दिवसान दिवस नवाब मलिक यांच्या कडून रोज रोज नवीन आरोप होत आहे या पार्श्वभूमीवर आज समीर वानखडे हे सहपरिवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सायंकाळी 5.30 वाजता भेट घेणार आहे नवाब मलिक यांच्या यांच्यावर ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील ते राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारमधील मंत्र्यांविरुद्ध राज्यपाल संघर्ष पाहायला मिळू शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.