ETV Bharat / city

महापालिकेच्या ‘वॉर्ड वॉर रूम'मधून ४ महिन्यात ८२ हजार ९७३ कोरोना रुग्णांना खाटांचे वितरण - मुंबई महापालिका वॉर्ड वॉर रूम

सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये ‘वॉर्ड वॉर रूम’ सुरू करण्यात येऊन त्यांच्याद्वारे विभागस्तरावर विकेंद्रित पद्धतीने बेड अलॉटमेंट पद्धती जून २०२० पासून सुरू करण्यात आली.

वॉर्ड वॉर रूम
वॉर्ड वॉर रूम
author img

By

Published : Oct 8, 2020, 8:42 PM IST

मुंबई - कोरोनाबाधित रुग्णांना प्रभावी वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी महापालिका क्षेत्रातील पालिका रुग्णालये आणि खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटांचे जलद गतीने वितरण करता यावे, म्हणून २४ विभाग कार्यालयांमध्ये २४ ‘वॉर्ड वॉर रूम’ जून २०२० पासून सुरू करण्यात आले आहेत. या वॉर रूमच्या माध्यमातून ३० सप्टेंबर २०२० पर्यंत साधारणपणे ४ महिन्यांच्या कालावधीत ८२ हजार ९७३ बाधित रुग्णांना खाटांचे वितरण करण्यात आले आहे.

खाटा वितरणासोबतच कोविडबाधित रुग्णांना, रुग्णाच्या नातेवाईकांना व निकटच्या संपर्कातील व्यक्तींना तसेच विभागातील नागरिकांना दूरध्वनीद्वारे समुपदेशन करण्याचे आणि अति जोखीम गटातील व्यक्तींशी संपर्क साधण्याचे व त्यांनाही समुपदेशन करण्याचे महत्त्वाचे कार्यदेखील ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे करण्यात येत आहे. तसेच कोविड विषयक वैद्यकीय चाचणी अहवालांचे व्यवस्थापन करण्यासह त्याबाबतची माहिती सुव्यवस्थितपणे संकलित करण्याचे कामही ‘वॉर्ड वॉर रुम’ द्वारे करण्यात येत आहे. ३ पाळ्यांमध्ये अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या या २४ ‘वॉर्ड वॉर रूम’ मध्ये प्रत्येक पाळीत साधारणपणे प्रत्येकी ८ ते १०, यानुसार ३ पाळ्यांमध्ये एकूण २४ ते ३० कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये डॉक्टरांसह महापालिकेच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा - घरात मानसिक त्रास, बाहेर चोरट्यांचा हल्ला; राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पहिला कोविडबाधित रुग्ण मार्च २०२० मध्ये आढळून आला. त्यानंतर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन विविध रुग्णालयांमधील खाटा वितरण सुयोग्य पद्धतीने व्हावे, यासाठी १९१६ या दूरध्वनी क्रमांकाद्वारे केंद्रीय खाटा वितरण पद्धत सुरू करण्यात आली. तथापि, रुग्णांची संख्या वाढल्यानंतर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये ‘वॉर्ड वॉर रूम’ सुरू करण्यात येऊन त्यांच्याद्वारे विभागस्तरावर विकेंद्रित पद्धतीने बेड अलॉटमेंट पद्धती जून २०२० पासून सुरू करण्यात आली.

विकेंद्रित ‘बेड अलॉटमेंट’ पद्धती अंतर्गत रुग्ण ज्या विभागातील असेल, त्या विभागाच्या ‘वॉर्ड वॉर रुम’ द्वारे ‘बेड अलॉटमेंट’ करण्यात येत आहे. तसेच सर्व २४ ‘वॉर्ड वॉर रुम’ या एका संगणकीय प्रणाली आधारित ‘डॅश बोर्ड’शी जोडलेल्या असून त्यामध्ये रुग्णालयातील उपलब्ध खाटांची माहिती नियमितपणे अद्ययावत करण्यात येत आहे. तर ज्‍या विभागातील बाधित रुग्‍णाची माहिती ‘वॉर्ड वॉर रुम’ कडे आलेली आहे, अशा रुग्‍णाला संबधित विभागाच्या ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे स्वतःहून दूरध्वनी करण्यात येऊन रुग्णाच्या सुविधेनुसार व रुग्णालयातील उपलब्धतेनुसार खाटेचे वितरण केले जात आहे.

हेही वाचा - मध्य रेल्वेकडून 8 लांब पल्ल्यांच्या जादा गाड्या; 9 ऑक्टोबरपासून होणार आरक्षण सुरू

वरीलनुसार खाटेचे वितरण केल्यानंतर रुग्णाला संबंधित रुग्णालयात दाखल करण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टिने रुग्णवाहिकेचे समन्वयन करण्यासह इतर बाबीदेखील ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे करण्यात येत आहेत. ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार अव्याहतपणे करण्यात येत असलेल्या या सातत्यपूर्ण व विकेंद्रीत स्वरुपाच्या कार्यवाहीमुळे ‘बेड अलॉटमेंट’ विषयक व्यवस्थापन प्रभावीपणे करणे साध्य झाले आहे. परिणामी, कोविडबाधित रुग्णांना अधिक लवकर व प्रभावी उपचार मिळणे शक्य झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.