ETV Bharat / city

Shashi Tharoor With Women MPs : शशी थरुर यांनी मागितली माफी, संसदेला म्हणाले होते "आकर्षक ठिकाण" - Lok Sabha attractive place Shashi Tharoor

आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन (winter session of parliament 2021) सुरू झाले. प्रत्येक अधिवेशनाची सुरुवात धमाक्याने होत असते तशी ती कृषी कायदे (farm bills repealed in parliament 2021) मागे घेण्याच्या निर्णयाने झाली. अशातच आणखी एक संसदेशी संबंधित बातमी चर्चेत आली आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरुर ( Congress MP Shashi Tharoor ) यांनी आज सकाळी केलेल्या ट्विटमुळे चर्चेचा उधाण आलंय. या वादावर पडदा टाकण्यासाठी अखेर शशी थरुर यांनी माफी मागितली (apology by Shashi Tharoor on Women MPs) आहे.

महिला खासदारांसोबतच्या फोटोवरुन वाद
महिला खासदारांसोबतच्या फोटोवरुन वाद
author img

By

Published : Nov 29, 2021, 4:00 PM IST

Updated : Nov 29, 2021, 6:58 PM IST

हैदराबाद - आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. प्रत्येक अधिवेशनाची सुरुवात धमाक्याने होत असते तशी ती कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाने झाली. अशातच आणखी एक संसदेशी संबंधित बातमी चर्चेत आली आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरुर (Congress MP Shashi Tharoor) यांनी आज सकाळी केलेल्या ट्विटमुळे चर्चेचा उधाण आलंय. थरुर हे नेहमीच त्यांच्या अस्खलित इंग्रजीमुळे चर्चेत राहतात. खासदार शशी थरुर यांनी आज पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांच्यासोबत सहा महिला खासदार(photo of Shashi Tharoor with women MPs) दिसत आहेत.

फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, "कोण म्हणतं लोकसभा हे कामासाठी आकर्षक ठिकाण नाही? आज सकाळी माझ्या सहा सहकारी खासदारांसोबत", असं लिहित त्यांनी सहा खासदारांच्या नावांना टॅग केले आहे. सुप्रिया सुळे,परनित कौर, नुसरत जहाँ, मिमि चक्रवर्ती, ज्योतिमणी आणि थामीझाची या सहा महिला खासदार फोटोत दिसतात.

  • Women in the Lok Sabha are not decorative items meant to make your workspace "attractive". They are parliamentarians and you are being disrespectful adn sexist.

    — Vidya (@VidyaKrishnan) November 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शशी थरुर यांनी फोटोला दिलेल्या कॅप्शनवरुन चर्चेला उधाण आले असून टीका करणारे आणि कौतुक करणारे असे दोन गट यामुळे पडल्याचे चित्र आहे.

या फोटोत थरुर यांच्यासोबत सहाही महिला असल्यामुळे त्या फक्त सौंदर्यासाठी ओळखल्या जातात का असा सवाल केला जात आहे. लोकसभेचे कामकाज केवळ आकर्षक होण्यासाठी या महिला तिथे गेलेल्या नाहीत. त्या सभागृहाच्या सन्माननीय सदस्या आहेत, त्यांचा अपमान शशी थरुर यांनी केला आहे, अशीही टीका होत आहे.

तर अशा चर्चेकडे दुर्लक्ष करण्याची गरज असल्याचे व या ट्विटकडे चुकीच्या अर्थाने पाहिले जात असल्याचाही एक मतप्रवाह दिसून येत आहे.

  • The whole selfie thing was done (at the women MPs' initiative) in great good humour & it was they who asked me to tweet it in the same spirit. I am sorry some people are offended but i was happy to be roped in to this show of workplace camaraderie. That's all this is. https://t.co/MfpcilPmSB

    — Shashi Tharoor (@ShashiTharoor) November 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शशी थरुर यांनी मागितली माफी

सोशल मीडियावर ट्रेलिंग झाल्यानंतर शशी थरुर यांनी अखेर माफी मागितली (apology from Shashi Tharoor)आहे. त्यांनी म्हटलंय ,"गंमत म्हणून सेल्फी घेतली होती आणि त्या महिलांनी ( महिला खासदारांच्या सांगण्यावरुन) मला त्याच पध्दतीने ट्विट करण्यास सांगितले होते. काही लोकांना वाईट वाटले असल्यास मला माफ करा. परंतु कामाच्या ठिकाणी असलेल्या सौहार्दाच्या या प्रसंगात सहभागी झाल्याचा आनंद झाला. इतकीच गोष्ट आहे."

हेही वाचा - ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मध्ये पाहा कलाकारांचा मराठी रेट्रो लूक

Last Updated : Nov 29, 2021, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.