ETV Bharat / city

दवाखाने, क्लिनिक, ओपीडी उद्या सकाळी ६ ते संध्याकाळी ६ दरम्यान बंद; दीड लाखांहुन अधिक डॉक्टर संपावर - ima strike update news

उद्या देशभरातील लाखो आयएमए डॉक्टर संपावर जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील दीड लाखांहून अधिक डॉक्टरांचा समावेश असणार असून राज्यातील दवाखाने, क्लिनिक, हॉस्पिटलमधील ओपीडी बंद असणार आहे.

doctors
doctors
author img

By

Published : Dec 10, 2020, 3:48 PM IST

मुंबई - आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने जोरदार विरोध केला आहे. तर हा निर्णय त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी आयएमए आक्रमक झाली आहे. उद्या देशभरातील लाखो आयएमए डॉक्टर संपावर जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील दीड लाखांहून अधिक डॉक्टरांचा समावेश असणार असून राज्यातील दवाखाने, क्लिनिक, हॉस्पिटलमधील ओपीडी बंद असणार आहे. सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत डॉक्टरांचा संप असणार आहे. त्यामुळे या काळात राज्यासह देशभरातील आरोग्य व्यवस्था ऑक्सिजनवर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

...म्हणून आयएमए आक्रमक

केंद्रीय मंत्रालयाच्या कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने 24 नोव्हेंबरला एक परिपत्रक काढत आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार आता एमएस केलेल्या आयुष डॉक्टरांना 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करता येणार आहेत. पण या निर्णयाला आयएमए डॉक्टरांनी मात्र जोरदार विरोध केला आहे. अत्याधुनिक वैद्यकीय शास्त्रातील शस्त्रक्रिया करण्यास आयुष डॉक्टरांना परवानगी देणे म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळ असल्याचे म्हणत आयएमएने याला विरोध केला आहे. तर ही मागणी त्वरित रद्द करावी यासाठी 2 डिसेंबरपासून आंदोलन छेडले आहे. त्यानुसार देशभर विविध माध्यमातून आंदोलन, निदर्शने केली जात आहेत. 8 डिसेंबरला महाराष्ट्रभर डॉक्टरांनी निदर्शने केली. देशभर डॉक्टर आंदोलन करत असताना ही केंद्र सरकारकडून मात्र याची दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे आता डॉक्टर आणखी आक्रमक झाले असून त्यांनी याआधी घोषणा केल्यानुसार उद्या हे डॉक्टर संपावर जाणार आहेत.

केवळ 'ही' सेवा राहणार सुरू

सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. तेव्हा सर्दी-खोकला वा इतर लक्षणे असतील तर आजच डॉक्टरांना गाठण्याची गरज आहे. तर इतरही काही आजार असल्यासही आजच डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. कारण उद्या डॉक्टर संपावर जाणार असून त्यानंतर शनिवार-रविवार आहे. राज्यातील आयएमए डॉक्टरांचे सर्व दवाखाने, क्लिनिक आणि नर्सिंग होममधील ओपीडी बंद असणार आहेत. तेव्हा काही ही त्रास वाटला तर थेट पालिकेच्या वा सरकारी रुग्णालयात धाव घ्यावी लागणार आहे. दरम्यान, दवाखाने, क्लिनिक आणि ओपीडी सेवा उद्या बंद राहणार असल्या तरी आयसीयू, अपघात विभाग आणि कोरोना कक्षातील रुग्णसेवा मात्र सुरळीत असणार आहे, अशी माहिती डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र यांनी दिली आहे.

...अन्यथा कोर्टात जाणार

उद्याच्या संपात महराष्ट्रातील आयएमए 218 शाखामधील 45 हजार डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील 1 लाख 10 हजार डॉक्टर यात सहभागी होणार आहेत. तर एमएमबीएस विद्यार्थी, निवासी डॉक्टरांचा ही या संपाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान उद्याच्या आंदोलनानंतर केंद्राने लक्ष दिले नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा दिला आहे. तर गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असेही आयएमएने स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.