मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी अडीच तासांच्या चर्चेनंतर बुधवारी सकाळी ११:३० वाजता निर्णय होणार आहे. नारायण राणे यांच्या वतीने त्यांचे वकील सतीश माने शिंदे यांनी बाजू मांडली, तर मुंबई मालवणी पोलिसांच्या वतीने सरकारी वकील आणि डीसीपी विशाल ठाकूर यांनी बाजू मांडली. यावेळी दिवंगत दिशा ( Disha Salian Case ) सालियानचा प्रियकरही न्यायालयात उपस्थित होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने याबाबतचा निर्णय बुधवारपर्यंत राखून ठेवला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबईच्या दिंडोशी न्यायालयाने सुनावणी पूर्ण केली आहे. बुधवारी न्यायालय दोघांच्या अटकपूर्व जामिनावर निकाल देणार आहे. दिंडोशी कोर्टात मंगळवारी अडीच तास सुनावणी झाली.
हेही वाचा - राज्यात ९ हजार ५०२ रिक्षा चालकांवर कारवाई; २६१ रिक्षाचालकांचे परवाने निलंबन
न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
न्यायालयाच्या संकुलात नारायण राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे आणि दिशा सालियन यांचा प्रियकर, डीसीपी विशाल ठाकूर आणि मालवणी पोलिसांच्या वतीने वरिष्ठ पीआय भालेराव यांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले.
८ जून २०२० रोजी दिशाचा मृत्यू झाला
दिशा सालियान हिने ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. सहा दिवसांनंतर, अभिनेता सुशांत सिंग राजपूत उपनगरातील वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता.