ETV Bharat / city

'कोरोनामुळे जगभरात शिक्षणाचा खोळंबा, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य; तरीही शिक्षण सुरूच' - महाविकास आघाडी सरकार वर्षपूर्ती न्यूज

जगभरातल्या दोनशेहून अधिक देशांमध्ये कोरोनाच्या महामारीमुळे व्यवहार बंद झाले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने शाळा-महाविद्यालयेही बंद झाली. अजूनही अनेक भागात शाळा सुरू नसल्या तरी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू असल्याची माहिती शिक्षण मंत्री गायकवाड यांनी दिली. दरम्यान, सध्याचे सरकार तीन विभिन्न विचारसरणीचे असून त्यांच्यात मतभेद असले तरी विकासाला प्राधान्य देत सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असे त्या म्हणाल्या.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड न्यूज
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड न्यूज
author img

By

Published : Nov 27, 2020, 1:36 PM IST

Updated : Nov 27, 2020, 2:16 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकारपुढे कोरोनाचे निवारण करण्यासह जनतेच्या महत्त्वाच्या बाबी सुधारण्याचे आव्हान होते. शिक्षण हा जीवनातला भाग असल्याने कोरोना काळात शिक्षण सुरू कसे ठेवायचे हा मोठा प्रश्न होता. मात्र आपण शिक्षण थांबवले नाही, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ईटीव्ही भारतला सांगितले. महाविकास आघाडी सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला असून यानिमित्त त्यांनी ईटीव्ही सोबत विशेष बातचीत केली.

जगभरातल्या दोनशेहून अधिक देशांमध्ये कोरोनाच्या महामारीमुळे व्यवहार बंद झाले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने शाळा आणि महाविद्यालयेही बंद करण्यात आली. मात्र, यावर काहीतरी तोडगा काढणे महत्त्वाचे असल्याने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय पुढे आला. अजूनही अनेक भागात शाळा सुरू नाहीत. पण ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू असल्याची माहिती शिक्षण मंत्री गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा - महाविकास आघाडी वर्षपूर्ती : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची 'विशेष मुलाखत'

सरकारने सुरू केले 'दीक्षा' अ‌ॅप -

राज्यातल्या शाळा बंद असल्या तरी सरकारच्या पुढाकाराने दीक्षा अ‌ॅप सुरू केले. या अ‌ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करण्याचा उपक्रम सुरू केला. याचा आज हजारो विद्यार्थी लाभ घेत असल्याचे शिक्षण मंत्री गायकवाड यांचे म्हणणे आहे.

* प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू करणे, हे सरकारपुढे मोठे आव्हान होते. मात्र जिओ टीव्हीवर इयत्ता 3 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रसारण करण्यात आले. जिओ सावन या रेडिओ वाहिनीवरही शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

* आपल्या सरकारी सह्याद्री वाहिनीवर पहिली ते आठवीसाठी 'टिलीमिली' हा शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात आला.

* गुगलच्या साहाय्याने क्लासरूम उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचा उल्लेख शिक्षण मंत्र्यांनी केला.

दरम्यान, राज्य संकटात असताना विरोधकांनी राजकारण केले. सरकारला मार्गदर्शक सूचना करण्याऐवजी विरोधकांनी संकटाचे भांडवल करण्यास सुरुवात केली. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर पेच निर्माण झाला असताना जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. यातूनही मार्ग काढू, असेही गायकवाड यांनी सांगितले.

शाळा नियमित कधी सुरू होणार -

शाळा नियमित कधी सुरू होणार याबाबत आताच काही सांगता येणार नाही. गेले आठ महिने शाळा, महाविद्यालये सुरू नाहीत. मात्र, आता जिल्हा प्रशासनाला शाळा सुरू करण्यासाठी परिस्थितीजन्य निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. शाळा नियमित कधी सुरू होणार हे मात्र आताच सांगता येणार नाही, असेही गायकवाड यांनीं स्पष्ट केले.

सामूहिक कामात मतभेद असतातच -

तीन विभिन्न विचारसरणीचे सरकार आहे. यात मतभेद नाहीत असे नाही. पण किमान समान कार्यक्रमांतर्गत चर्चेतून तोडगा काढून सरकार चालवावे लागत आहे. हे सरकार चालवताना विकासाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येईल आणि सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असेही काँग्रेसच्या नेत्या आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा - कंगनाला नुकसान भरपाई मिळणार -उच्च न्यायालयाचा महापालिकेला दणका

Last Updated : Nov 27, 2020, 2:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.