ETV Bharat / city

जावेद अख्तर मानहानी प्रकरण : दिंडोशी न्यायालयाने कंगनाची याचिका फेटाळली - Dindoshi Court news

जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी दावा प्रकरणी मुंबईतील दिंडोशी येथील न्यायालयाने अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयाच्या कार्यवाहीला आव्हान देणारी कंगनाची सुधारित याचिका फेटाळली आहे.

Kangana Ranaut
अभिनेत्री कंगना रणौत
author img

By

Published : Apr 5, 2021, 5:42 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतने दाखल केलेली याचिका दिंडोशी सत्र न्यायालयाने आज फेटाळली आहे. जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी दावा प्रकरणी मुंबईतील दिंडोशी येथील न्यायालयाने अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयाच्या कार्यवाहीला आव्हान देणारी कंगनाची सुधारित याचिका फेटाळली आहे. शनिवारी मुंबईतील दिंडोशी येथील न्यायालयाने आपला निर्णय या प्रकरणात राखून ठेवला होता. कंगनाच्या विरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने केलेल्या कारवाईला आव्हान देणारी याचिका दिंडोशी न्यायालयात दाखल केली होती.

हेही वाचा - रायगड जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांना बसणार मिनी लॉकडाऊनचा फटका

काय आहे प्रकरण -

जावेद अख्तर यांनी कंगना रणौत विरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीवर कंगना रणौतने न्यायालयात धाव घेतली होती. मागील सुनावणीत कंगना रणौतला मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी कोर्टाने या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. कंगनाला जामीन 15 हजार रुपयांच्या बाँडवर आणि 20 हजार रुपयांची रोकड हमी दिल्यावर मंजूर झाला. जावेद अख्तर मानहानी प्रकरणात अंधेरी कोर्टाच्या दंडाधिकाऱयांनी अभिनेत्री कंगना रनौत हिला जामीन मंजूर केला. जावेद अख्तर मानहानी प्रकरणात कंगना रणौत विरूद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. कंगनाने हे रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

गीतकार जावेद अख्तरच्या तक्रारीवरून मुंबईच्या कोर्टाने अभिनेत्री कंगना रनौतला समन्स बजावले होते. जावेद अख्तरने कंगनाविरोधात तक्रार दिल्यानंतर कथित मानहानीची तक्रार केली जाते आणि पुढील तपास आवश्यक आहे, असे मुंबई पोलिसांनी कोर्टाला सांगितले. डिसेंबर २०२० मध्ये अंधेरी मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी यांनी जुहू पोलिसांना अख्तरने रणौत यांच्याविरोधात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्यायालयासमोर दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीचा तपास करण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा - बीजापूर हल्ल्यात नक्षलवाद्यांनी जम्मू-काश्मिरच्या जवानाला ठेवले ओलीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.