मुंबई- मुंबईकरांना एक दिवस तरी तणावमुक्त वातावरणात वावरता यावे यासाठी मुंबई पोलिसांनी संडे स्ट्रीट मोहीम सुरु ( Sunday Street campaign begins ) केली आहे. या मेहिमेअंतर्गत मुंबईकरांना रस्त्यावर मनोरंजन, योगा, जॉगिंग, सायकलिंग, ( Recreation, Yoga, Jogging, Cycling ) सांस्कृतिक खेळ यासारख्या कार्यक्रमांचा आनंद घेता येतो. पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation ) मदतीने संडेस्ट्रीट ही मोहीम दर रविवारी राबवली जाते.आज मरीन ड्राईव्ह परिसरात संडे स्ट्रीट मोहीम पार पडली, या मोहिमेला मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अभिनेता अक्षय कुमार तसेच पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हजेरी लावली होती.
हेही वाचा- फादर्स डे 2022: चित्रपटांमधील वडील ज्यांनी रूढीवादी परंपरांच्या विरोधात आपल्या मुलींना पाठबळ दि
अक्षय कुमार घेतला सायकलिंग चालवण्याचा मनसोक्त आनंद - संडेस्ट्रीट मध्ये आज मरीन ड्राईव्ह येथे अभिनेता अक्षय कुमार यांनी सायकलिंग करण्याचा मनसोक्त आनंद घेतला आहे. त्यावेळी बोलताना अक्षय कुमार म्हणाले की, आज या ठिकाणी येऊन मला आनंद झाला. कोविड काळात सर्वत्र शांतता होती. यानंतर दिसणार हे चित्र दिलासादायक आहे. ही संडेस्ट्रीट कल्पना कायम राहावी. केवळ रविवारीचं नाही तर दररोज व्यायाम करावा. सर्व लोकांसोबत चांगले संबंध जोडण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे. आपल्या पोलीस दलातही अनेक कलाकार आहेत. अशी प्रतिक्रिया अभिनेता अक्षय कुमार यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्यावेळी बोलले आहे.
मुंबईकरांना काहीसा दिलासा - धक्काधक्कीच्या व्यस्त जीवनातून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळावा. त्यांचा तणाव दूर व्हावा यासाठी मुंबई पोलिसांकडून संडेस्ट्रीट ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यावेळी मुंबई रस्त्यावर येवून मनोरंजन, योगा, स्केटिंग, सायकलींग तसेच सांस्कृतिक खेळ यासारखे कार्यक्रम करता यावेत यासाठी प्रत्येक रविवारी सकाळी 6 ते 10 वेळेत रस्ते वाहतुकीसाठी बंद करुन ते नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येतात. आज मरीन ड्राइव्ह या ठिकाणी दिलीप वळसे पाटील, अभिनेता अक्षय कुमार आणि पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नागरिकांसह संडेस्ट्रीटमध्ये सहभाग घेतला आहे.
13 ठिकाणी संडेस्ट्रीट कार्यक्रमाचे आयोजन - आज एकुण 13 ठिकाणी संडेस्ट्रीट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये, मरीन ड्राइव्ह, दोराभाई टाटा रोड नरिमन पॉईंट, वांद्रे - कार्टर रोड, गोरेगाव माईंड स्पेस मागील रस्ता, दा. नौ. नगर लोखंडवाला मार्ग, मुलुंड तानसा पाईप लाईन, विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्ग, विक्रोळी ब्रिज या ठिकाणांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाचा उद्देश मुंबईकरांना घराबाहेर पडून मजा करता यावी खेळ आणि उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणं हा आहे.
संडेस्ट्रीड म्हणजे काय आहे - आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून 27 मार्चपासून मुंबईकरांसाठी संडेस्ट्रीट सुरू करण्यात आले आहे. मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या पुढाकाराने मुंबईत सहा ठिकाणी हे सँडेस्ट्रीट सुरू करण्यात आले आहेत. मुंबईकरांना रस्त्यावर येवून मनोरंजन, योगा, स्केटिंग, सायकलींग तसेच सांस्कृतिक खेळ यासारखे कार्यक्रम करता यावेत यासाठी संडेस्ट्रीट ही संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रत्येक रविवारी सकाळी 6 ते 10 वेळेत रस्ते वाहतुकीसाठी बंद करुन ते नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. संजय पांडे यांनी मरीन ड्राइव्ह या ठिकाणी या संडेस्ट्रीटमध्ये सहभाग घेतला होता. मरीन ड्राइव्ह परिसरात मोठ्या प्रमाणत मुंबईच्या विविध भागातून नागरिक दाखल झाले होते. कोणी या मोकळ्या रस्त्यावर बॅडमिंटन खेळत होते, कोणी सायकलींग करीत होते, तर कोणी स्केटिंग आणि योगा करीत होते. या संकल्पनेचे मुंबईकरांनी जल्लोषात स्वागत केले. त्याचबरोबर मुंबईच्या विविध भागात ही संडेस्ट्रीट तयार करावी अशी मागणी करण्यात आली आहे.