मुंबई - लोकशाही दिनाच्या धर्तीवर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आता दर महिना संवाद दिन आयोजित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कार्यवाही करण्याच्या सूचना - शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत मान्यता प्राप्त खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक विभागीय स्तरावर संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी, पालक व शाळा, संस्था यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधीत विभाग यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावर तक्रार निवारण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांनी संबंधीत घटकांच्या तक्रारीसंदर्भात ‘संवाद दिना निमित्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शिक्षण विभागाने काढले आदेश - शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत मान्यताप्राप्त खासगी सर्व प्रकारच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेचे महत्व आहे. त्यामुळे समाजाचे सकारात्मक परिवर्तन होण्यामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका विचारात घेता, सदर घटकांच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय भूमिकेतून तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी संवाद दिन आवश्यक आहे. लोकशाही दिनाच्या धर्तीवर शालेय शिक्षण विभागामार्फत 'संवाद दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने आदेश सुद्धा काढले आहे.
असा असणार संवाद दिन - शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत मान्यता प्राप्त खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर ‘संवाद दिन' आयोजित कार्यवाहीबाबत मार्गदर्शक तत्वे विहित केली आहेत. ज्यामध्ये जिल्हास्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार (दुपार सत्र) शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक विभागीय स्तर विभागीय शिक्षण प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार (दुपार सत्र) ३ राज्यस्तर उपसंचालक शिक्षण संचालक (प्राथमिक / माध्यमिक प्रत्येक महिन्याचा चौथा सोमवार (दुपार सत्र) व उच्च माध्यमिक) “संवाद दिन” पाळण्यात येईल. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास, त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस “संवाद दिन” म्हणून पाळण्यात येईल.
आता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी प्रत्येक महिन्यात 'संवाद दिन' - grievances of teachers and non-teaching staff
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आता दर महिना संवाद दिन आयोजित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. लोकशाही दिनाच्या धर्तीवर शालेय शिक्षण विभागामार्फत 'संवाद दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने आदेश सुद्धा काढले आहे.