ETV Bharat / city

थोरात, शिंदेंच्या उपस्थितीत धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपल्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासहित त्यांनी पक्षप्रवेश केला.

mohite
mohite
author img

By

Published : Jan 28, 2021, 6:09 PM IST

Updated : Jan 28, 2021, 6:16 PM IST

मुंबई - पश्चिम महाराष्ट्रातील भाजपाचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपल्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासहित त्यांनी पक्षप्रवेश केला.

थोरात, शिंदेंची उपस्थिती

दादरमधील काँग्रेस प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपास्थितीत हा प्रवेश करण्यात आला असून यावेळी लातूरचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख आणि खासदार हुसेन दलवाई हेही उपस्थित होते. सोलापुरातील मोहिते पाटील कुटुंब आणि काँग्रेसचे जुने नाते असून धवलसिंह मोहिते पाटील यांचे वडील प्रतापसिंह मोहिते हे काँग्रेसचे नेते होते. पक्षप्रवेश करताना आपल्याला काँग्रेसपक्षात काम करण्याची संधी दिल्याने त्यांनी आभार मानले.

राजकीय प्रवास

धवलसिंह हे काही काळ शिवसेनेत होते. मात्र राजकीय करणावास्त त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर मात्र त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाला मदत होईल, अशी भूमिका त्यांनी नेहमी घेतली. मात्र आता त्यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करत होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम दिला.

Last Updated : Jan 28, 2021, 6:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.