ETV Bharat / city

धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत.. तक्रार करणारी करुणा शर्मा कोण अन् काय आहे प्रकरण - करुणा शर्मा यांची धनंजय मुंडेविरोधात तक्रार

समाज कल्याणमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी आज (बुधवार) मुंबई पोलीस आयुक्तांकडे मुंडेविरोधात तक्रार केली आहे. जाणून घेऊया कोण आहेत करुणा-रेणू शर्मा व काय आहे प्रकरण..

dhananjay-munde-
dhananjay-munde-
author img

By

Published : Feb 3, 2021, 6:58 PM IST

मुंबई - समाज कल्याणमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी आज (बुधवार) मुंबई पोलीस आयुक्तांकडे मुंडेविरोधात तक्रार केली आहे. त्यात, गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यात १४ वर्षाची मुलीचाही समावेश असून, ती सुरक्षित नसल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी सहकार्य न केल्यास २० फेब्रूवारीपासून आमरण उपोषणाचा इशाराही करुणा शर्मा यांनी दिला आहे.

कोण आहेत करुणा शर्मा ?

मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप केल्यानंतर करुणा शर्मा हे नाव प्रकाशझोतात आले. करुणा शर्मा ही मॉडल तरुणी होती व २००३ पासून तिचे धनंजय मुंडे यांच्यासोबत संबंध होता. बलात्काराच्या कथित आरोपानंतर त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका व करुणा शर्मा नावाच्या महिलेबाबत असणारे संबंध सोशल मीडियावर पोस्ट लिहून स्पष्ट केली. त्यात मुंडे यांनी म्हटले की, करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना माहित होती. आम्हा दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.

करुणा शर्मा यांनी पोलीस आयुक्तांकडे केलेली लेखी तक्रार

करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत. मात्र २०१९ पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिविताल धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. असे नमूद केले होते.

फेसबुकवर काय म्हणतात करुणा ?

आज माझा वाढदिवस आहे, परंतु माझ्या पतीने माझ्या मुलांना 3 महिने चित्रकूटमध्ये त्यांच्या बंगल्यात लपवून ठेवले आहे आणि मला भेटू, बोलूही देत नाहीत. राजकीय ताकदीचा दुरूपयोग केला जात आहे. रावणानेही इतका अत्याचार केला नसता.

कोण आहेत रेणू शर्मा -

रेणू शर्मा हिने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. मात्र रेणू शर्मा कोण, याची चर्चा सुरु झाली. मात्र, धनंजय मुंडे यांनी आरोप फेटळताना वस्तूस्थिती मीडियासमोर ठेवली. त्यानंतर करुणा शर्मा हे नाव पुढे आले. रेणू शर्मा ही करुणा शर्मा हिची लहान बहीण आहे. तिनेच मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.

धनंजय मुंडे यांच्याशी जोडलेल्या करुणा शर्मा या इंदौरच्या राहणाऱ्या आहेत. 1998 मध्ये धनंजय मुंडे यांनी बहीण करुणा हिच्याशी लग्न केल्याचे रेणूचे म्हणणे आहे. रेणू शर्मा गायकही असल्याचे समजते.

धनंजय मुंडे यांचा दावा काय?

समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्रं प्रसारित करुन माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहे.

या बाबत 12 नोव्हेंबर 2020 रोजी मे 2019 पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलिसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये श्रीमती करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर माझी बदनामी करण्याच्या हेतुने, मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत आणि खाजगी साहित्य प्रकाशित केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात श्रीमती करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे.

तथापी रेणू शर्मा यांनी माझ्या विरुद्ध खोटे आणि बदनामीकारक आणि माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी या संदर्भात विविध प्राधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीच्या प्रतिदेखील समाज माध्यमातून प्रसारित केल्या आहेत. या सर्व तक्रारी खोट्या आहेत, श्रीमती करुणा शर्मा, त्यांची बहीण रेणू शर्मा आणि त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांच्या मला ब्लॅकमेल करणे आणि माझ्या कडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.