ETV Bharat / city

Babasaheb Ambedkar Statue : इंदू मिलमधील डॉ. आंबेडकरांच्या 350 फुट पुतळ्याची प्रतिकृतीची तयार, धनंजय मुंडेंनी केली पाहणी - बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रतिकृती धनंजय मुंडे पाहणी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar Statue ) यांच्या 350 फुटांच्या भव्य पुतळ्याच्या निर्माणाचे काम सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार ( Ram Sutar ) यांना देण्यात आले आहे. राम सुतार हे उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे पुतळ्याची ( Babasaheb Ambedkar Statue Manufacturing ) निर्मिती करत आहेत. या प्रतिकृतीची पाहणी करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gayaikwad ) गाझियाबाद येथे प्रत्यक्ष जाऊन भेट दिली.

Babasaheb Ambedkar Statue
Babasaheb Ambedkar Statue
author img

By

Published : May 19, 2022, 3:46 PM IST

Updated : May 19, 2022, 4:01 PM IST

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar Statue ) यांच्या 350 फुटांच्या भव्य पुतळ्याच्या निर्माणाचे काम सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार ( Ram Sutar ) यांना देण्यात आले आहे. राम सुतार हे उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे पुतळ्याची ( Babasaheb Ambedkar Statue Manufacturing ) निर्मिती करत आहेत. हा पुतळा कसा असेल हे दाखवण्यासाठी त्यांनी 25 फुटांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती तयार केली आहे. या प्रतिकृतीची पाहणी करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gayaikwad ) गाझियाबाद येथे प्रत्यक्ष जाऊन भेट दिली.

बाबासाहेबांच्या पुतळ्याची प्रतिकृती - दरम्यान, यावेळी पुतळ्याची विविध बाजूंनी आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची टिकाऊपणाची सर्वच बाबींची चर्चा आणि पाहणी यावेळी करण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. राम सुतार यांनी तयार केलेला हा 25 फुटी पुतळा अत्यंत सुबक आणि सुंदर असून यामध्ये फार काही बदल करण्याची गरज भासत नाही, काही तांत्रिक बाबी असतील तर त्या नक्कीच दुरुस्त केल्या जातील. मात्र, अशाच पद्धतीची प्रतिकृती 350 फुटांची तयार करण्यात येणार असून मार्च 2024 पर्यंत हा पुतळा तयार होईल, अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.

कसे असेल स्मारक? : या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रमधील ग्रंथालयात त्यांच्याबद्दलची माहिती, पुस्तके, लेख, जीवन चरित्र, माहितीपटाद्वारे केलेल्या सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय योगदानावर संशोधन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 400 लोकांची आसन क्षमता असलेल्या व्याख्यान वर्गांमध्ये कार्यशाळा घेण्याचीही सुविधा असणार आहे. तर एक हजार लोकांची आसन क्षमता असलेल्या अत्याधुनिक प्रेक्षकगृहामध्ये सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रम घेता येणार आहेत. विपश्यना वर्गासाठी येणाऱ्या लोकांना ध्यानसाधना केंद्राचा उपयोग करता येणार आहे. या ठिकाणी असलेल्या विद्यमान तळ्याची सुधारणा आणि सुशोभीकरण करून महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याची प्रतिकृती करण्यात येत आहे. स्मारकासाठी एकूण 709 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

काय आहे कामाची स्थिती? : जानेवारी २०१६ मध्ये या कामाचे कंत्राट शापूर्जी पालनजी कंपनीला देण्यात आले. सध्या या प्रकल्पाच्या एकूण कामापैकी ३५ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता रमेश साळुंखे यांनी दिली. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असून, त्यापैकी 100 फूट चौथऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य कांस्य पुतळा प्रख्यात मूर्तिकार पद्मभूषण राम सुतार यांच्या हस्ते साकारला जात आहे.

हेही वाचा - Navjot Singh Sidhu : नवज्योतसिंग सिद्धू चढले हत्तीवर; काँग्रेस कार्यकर्त्यांसह वाढत्या किमतीच्या विरोधात निदर्शने

Last Updated : May 19, 2022, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.