मुंबई : क्षणाक्षणाला वाढवणारी उत्कंठा आणि कथानकाला मिळणारं रंजक वळण यांची उत्तम सांगड घालत छोट्या पडद्यावरील देवमाणूस (Devmanus) या मालिकेनं अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली. मालिकेतील सर्व कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. मालिकेचं पहिलं पर्व यशस्वी झाल्यानंतर दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. दुसरं पर्व संपताना प्रेक्षकही भावुक झाले होते. मालिकेचा मुख्य चेहरा असलेला अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) सध्या काय करतोय, हा प्रश्न प्रेक्षक तसंच त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
'देवमाणूस' मालिकेतील डॉ. अजित कुमार म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड चर्चेत आला आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका देवमाणूस (Devmanus)ने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील पात्रदेखील खूप चर्चेत आली होती. या मालिकेमध्ये डॉक्टर अजित कुमार देव अनेकांना फसवताना दाखवण्यात आले आहे. आता या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील डॉ. अजित कुमार म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) चर्चेत येत असतो. दरम्यान आता तो प्रेमात पडल्याची सर्वत्र चर्चा होते आहे.
‘लागीरं झालं जी’ या मालिकेत किरण गायकवाडने भैय्यासाहेब ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळाले होते. या मालिकेतील किरणची सहकलाकार पूर्वा शिंदे हिच्यासोबत त्याने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. लागीरं झालं जी मालिकेत दोघेही नवरा-बायकोच्या भूमिकेत होते. पण सध्या त्यांच्या या रोमान्सची जोरात चर्चा सुरू आहे. एकूणच काय तर किरण गायकवाड आणि पूर्वा शिंदे आता एकमेकांच्या प्रेमात पडले की काय अशी चर्चा सगळीकडे रंगली आहे. मात्र अद्याप त्या दोघांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
किरण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याचे रिल्स व्हायरल होताना दिसतात. पण नुकताच त्यानं शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. चर्चेचं कारण म्हणजे, एका रोमॅन्टिक गाण्यावर त्यानं प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हा रिल व्हिडिओ बनवलं आहे. त्यामुळं या दोघांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. बघुया फोटो.