ETV Bharat / city

भाजप १२५ची यादी : पक्षावर अंकुश ठेवत कुरघोडी करणाऱ्यांना चाप लावण्यात 'देवेंद्रां'नी मारली बाजी - CM Devendraa Phadanvis controle on BJP

भाजपने १२५ उमेद्वारांची यादी जाहीर केली आहे. या संपूर्ण यादीचा विचार केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चतुराईने आपली खेळी केली आहे. पक्षात कुरघोडी होऊ नये याची पुपुर दक्षात घेतल्याचे स्पष्ट जाणवते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Oct 2, 2019, 5:03 AM IST

मुंबई - भारतीय जनता पक्षाची आगामी विधानसभेसाठी १२५ उमेद्वारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीवर एक कटाक्ष टाकला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पक्षावरील पकड घट्ट केल्याचे स्पष्ट दिसत आहे. या यादीत विद्यमान १२ आमदारांना तिकीट नाकारण्यात आलंय. दुसरे म्हणजे पक्षांतर्गत कुरबुरी करु शकतील अशा एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या दिग्गजांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. पुढच्या यादीत त्यांची नावे कदाचित येतीलही. परंतु आता तरी आमच्यावरच तुम्हाला अवलंबून राहावे लागेल असा सूचक इशाराच त्यांना देण्यात आलाय. एकंदरीत उमेदवार आपल्या ऐकण्यातले असतील याची पुरेपुर दक्षता फडणवीस यांनी घेतली आहे.

अलिकडे नाशिकमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे सूतोवाच केले होते. मोदी शाह यांचा भक्कम पाठिंबा आणि पुन्हा सत्तेत येण्यासाठी रचण्यात आलेली व्यूहरचना यावर संपूर्ण ताबा मिळवण्यात फडणवीस यशस्वी होताना दिसत आहेत. भाजप-सेना युती आणि त्याअंतर्गत येणारे मित्रपक्ष यांच्यावरही फडणवीस यांचेच नियंत्रण आहे.

देशातील विरोधी पक्ष हतबल करायचा चंग नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी बांधलाय. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्रातील विरोधी पक्ष विस्कळीत करण्यात फडणवीसांना चांगलेच यश मिळालं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रबळ मानली जाणारी घराणी सत्ते शिवाय राहू शकत नाहीत हे हेरुन जाळ्यात ओढण्याचे काम फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत शिताफीने केले आहे.

महाराष्ट्रात सलग ५ वर्ष मुख्यमंत्री होण्याचा मान भारतीय जनता पक्षाला देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालाय. राज्याच्या निर्मितीनंतर वसंतराव नाईक यांचा अपवाद वगळता सुमारे दीड डझन मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाले. परंतु एकाही व्यक्तीला ५ वर्षे पूर्ण करता आली नव्हती. देवेंद्र फडणवीस यांनी एका अर्थाने हा इतिहासच रचलाय असे म्हणू शकतो. शिवसेना कितीही आमचाच मुख्यमंत्री होणार असे म्हणत असली तरी हे शक्य नाही याची जाणीव त्यांनाही आहे. पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी फडणवीसांनी आपली कंबर कसली आहे. याचा प्रत्यय सध्या सुरू असलेल्या जागावाटपाचा गुंता त्यांनी ज्या प्रकारे हाताळलाय त्यावरुन येतो. एकंदरीत स्वःपक्ष, युतीतील पक्ष यांच्यावर एकाचवेळी अंकुश ठेवण्यात आणि विरोधकांना शिकस्त देण्यात देवेंद्र फडणवीस यांची मुत्सद्देगिरी फत्ते होताना दिसत आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.