ETV Bharat / city

Devendra Fadnavis - देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, निवडणुकीच्या रणधुमाळीत पुन्हा होणार सक्रिय - निवडणुकीच्या रणधुमाळीत पुन्हा होणार सक्रिय

ज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह ( Devendra Fadnavis Tested Negative For Corona ) आला आहे. 5 जूनला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितले होते. त्याचबरोबर या कारणासाठी ते होम आयसोलेशनमध्ये होते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले होते. पण, गुरुवार (दि. 9 जून) त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने राज्यात सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत ते पुन्हा जोमाने सक्रिय होणार आहेत.

सक्रिय
सक्रिय
author img

By

Published : Jun 9, 2022, 12:28 PM IST

मुंबई - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह ( Devendra Fadnavis Tested Negative For Corona ) आला आहे. 5 जूनला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितले होते. त्याचबरोबर या कारणासाठी ते होम आयसोलेशनमध्ये होते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले होते. पण, गुरुवार (दि. 9 जून) त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने राज्यात सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत ते पुन्हा जोमाने सक्रिय होणार आहेत. विशेष म्हणजे विधान परिषदेत मतदान करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका..? - राज्यसभेची निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली असताना महाविकास आघाडी असो की भाजप असो या अटीतटीच्या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून एकेका मताची जुळवाजुळव करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून धावपळ सुरू आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना 5 जून रोजी कोरोनाची लागण झाली असल्याने याची चिंता भाजपच्या उमेदवारांसोबत वरिष्ठ नेत्यांना आली होती. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे व ही जागा कुठल्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी भाजप पूर्णपणे ताकतीनिशी मैदानात उतरलेला आहे. आता देवेंद्र फडणीस यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ही एक मोठी सकारात्मक बाब भाजपसाठी ठरणार आहे.

भाजप नेत्यांमध्ये उत्साह - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवास्थानी भाजपच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. विशेष करून देवेंद्र फडवणीस यांचा कोरोना रिपोर्ट आज येणार असल्याकारणाने सकाळपासूनच भाजप नेत्यांची मोठी गर्दी फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी जमा झाली होती. मागील 5 दिवसांपासून देवेंद्र फडवणीस हे व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीमध्ये समाविष्ट होत होते. परंतु आता ते प्रत्यक्षात बैठकीत सक्रिय झाले असल्याने भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शेवटच्या क्षणी निवडणुकीसाठी आपले चक्र जोमाने फिरवणार हे निश्चित.

पंकजा मुंडेच तिकीट कापल्याचे खापर फडणीस यांच्यावर - 20 जूनला होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपले 5 उमेदवार बुधवारी (दि. 8 जून) घोषित केले. यामध्ये विशेष म्हणजे भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव वगळण्यात आले. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सुरू आहे. याविषयी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, कोणाला तिकीट द्यायचे किंवा नाही हा त्यांचा पक्षांतर्गत विषय असला तरीही पडद्यामागून पंकजा मुंडे यांच्या विरोधात षडयंत्र सुरू असल्याचे ते म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी न देणे हे फार दुर्दैवी आहे, असे सांगत त्या मोठ्या कर्तृत्वान महिला असून राजकारणात त्यांचे मोठे अस्तित्व आहे, असेही म्हटले आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी न देण्यावरून होणाऱ्या टिकेवर देवेंद्र फडवणीस काय भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - MLC Elections 2022 : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप सहावा उमेदवार रिंगणात उतरवणार?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.