ETV Bharat / city

Devendra Fadnavis : पीएफआय एक सायलेंट किलर; संबंधित ६ संघटनांवर बंदी - Devendra Fadnavis

केंद्र सरकारने शेवटी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( Popular Front of India ) यावर बंदी घातल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उलटायला सुरुवात झाली आहे. बंदी बाबत प्रत्येक राज्याने कारवाई करायची आहे. त्याचबरोबर पीएफआय शी संबंधित ६ संघटनांवर सुद्धा बंदी ( organizations related to PFI are also banned ) घालण्यात आली आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Sep 28, 2022, 1:53 PM IST

मुंबई : केंद्र सरकारने शेवटी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यावर बंदी घातल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उलटायला सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडवणीस ( Devendra Fadnavis ) यांनी सुद्धा या बंदीच समर्थन केलं, असून यापुढे सुद्धा अशा घटनांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल असे ते मुंबईत बोलत असताना म्हणाले.

देशातील वातावरण खिळखिळे करणे : याविषयी बोलताना देवेंद्र फडवणीस म्हणाले की पीएफआय विषयी सातत्याने इनपुट हे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या एजन्सीला वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून भेटत होते. दहशतवादी कृत्य करून देशाला खिळखिळे करणे हे एक प्रकारचे देशद्रोही कृत्य असून दुसरीकडे सायलेंटली हळुवारपणे सुद्धा देशाला खिळखिळे करण्याचं काम हे पीएफआय च्या मार्फत केलं जात होतं. देशात राज्यात अंतर्गत वादाचा भडका कसा निर्माण होईल हे काम पीएफआय करत होती, असंही देवेंद्र फडवणीस यांनी सांगितलं आहे. केरळ सरकारने सर्वात अगोदर पीएफआय वर बंदी घालण्याची मागणी केली. त्यानंतर वेगवेगळ्या राज्याने सुद्धा याबाबत केंद्र सरकारशी पाठपुरावा केला. उत्तर पूर्वेला मशिदी तोडल्याप्रकरणी मध्यंतरी फार मोठा भडका अमरावतीमध्ये उडाला होता. त्याचे पडसाद आपण सर्वांनी बघितले. वास्तविक याचा अमरावतीशी काही संबंध नव्हता. इतर देशातील त्याचबरोबर बांगलादेशचा त्याचा समावेश होता. तेच पीएफआय करत आहे. सध्या पीएफआय वर बंदी घातल्यानंतर त्यांचा फायनान्स मॉडेल काय आहे, कशा पद्धतीचे त्यांनी अकाउंट तयार केले आहेत, या सर्व गोष्टींचे पुरावे आता हाती लागतील. बंदी बाबत प्रत्येक राज्याने कारवाई करायची आहे. त्याचबरोबर पीएफआय शी संबंधित ६ संघटनांवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे.

प्रत्येक गोष्टीचा तपास केला जाईल : पीएफ सायलेंट किलर असून त्यांना माहीत होतं की भारतात आर्मी, इंटेलिजन्स सतर्क झाली आहे. म्हणून एक मानवी चेहरा पुढे करायचा व त्या मानवी चेहऱ्याच्या मागून अशा पद्धतीची कृत्य पीएफआय करत होती. सीमीवर बंदी घातल्यानंतर अशा पद्धतीची कृत्य मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. परंतु आता एक एक गोष्टी सर्व बाहेर येत जातील. देशभरात कारवाई केलेल्या त्याचबरोबर महाराष्ट्रात कारवाई केलेल्या लोकांवर योग्य त्या कलमा अंतर्गत कारवाई होईल. ज्या पद्धतीने त्यांचा सहभाग त्यामध्ये असेल त्या पद्धतीची त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही देवेंद्र फडवणीस म्हणाले. तसेच पीएफआय बरोबर ज्या फ्रंटल ६ ऑर्गनायझेशन तयार झाल्या आहेत त्याचे सुद्धा धागेदोरे कुठपर्यंत आहेत ते शोधून त्यांचे अकाउंट त्यांना फंड कुठून यायचा हे सर्व तपासलं जाईल, असेही देवेंद्र फडवणीस म्हणाले.

ज्यांची अक्कल कमी त्यांच्या बाबत बोलणे उचित नाही ? पीएफआय प्रमाणे आरएसएस वर सुद्धा बंदी घाला अशा पद्धतीच्या चर्चा विरोधकांकडून होत आहेत. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मूर्खा सारखे बोलणारे अनेक लोक आहेत. या सर्व गोष्टींसाठी पुरावे लागतात. आरएसएस विरोधात एकही प्रकरण किंवा पुरावा समोर आलेला नाही. ही मागणी अगोदर केरळ ने केली होती. ज्यांची अक्कल कमी आहे त्यांच्याबाबत बोलणे उचित होणार नाही, असे सांगत देवेंद्र फडवणीस यांनी विरोधकांना टोमणा लगावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.