ETV Bharat / city

Ranas Questions in Assembly Session : महाराष्ट्राचा! बंगाल करायचा आहे का? देवेंद्र फडणवीस आमदार रवि राणांच्या प्रश्नावर आक्रमक - Fadnavis on MLA Ravi Ranas questions in

अमरावतीचे महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर ( Amaravati MLA Pravin Ashtikar ) यांच्यावर शाई फेक केल्याप्रकरणी आमदार रवि राणा यांच्या विरोधात कलम ३०७, ३५३, ३२२ या पद्धतीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावरून राजकारण तापले असताना याप्रश्नी आज आमदार रवि राणा यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित ( MLA Ravi Rana in assembly session ) केला. या मुद्द्यावर चर्चा करताना सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी दिसून आली.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Mar 7, 2022, 7:52 PM IST

Updated : Mar 7, 2022, 7:58 PM IST

मुंबई - अमरावतीचे महानगरपालिका आयुक्तांवर ( Ink thrown on Amravati commissioner ) शाई फेकल्याप्रकरणी अमरावतीचे आमदार रवि राणा यांच्यावर गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले ( cases on MLA Ravi Rana ) आहेत. त्याबाबत आज विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला गेला. या प्रश्नासंबंधित चर्चेच्या दरम्यान उत्तर देताना राज्य सरकार गंभीर दिसले नाही. या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अखेर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी सरकारला महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

अमरावतीचे महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर ( Amaravati MLA Pravin Ashtikar ) यांच्यावर शाई फेक केल्याप्रकरणी आमदार रवि राणा यांच्या विरोधात कलम ३०७, ३५३, ३२२ या पद्धतीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावरून राजकारण तापले असताना याप्रश्नी आज आमदार रवि राणा यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित ( MLA Ravi Rana in assembly session ) केला. या मुद्द्यावर चर्चा करताना सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी दिसून आली.

देवेंद्र फडणवीस आमदार रवि राणांच्या प्रश्नावर आक्रमक

हेही वाचा-UP VIP Candidate List : उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीतील व्हीआयपी उमेदवार कोण?

आरोप करणे चुकीचे आहे - भास्कर जाधव

अखेर विरोधकांचा आक्रमकपणा पाहत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या दरम्यान आमदार रवि राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरही आरोप केले. या आरोपाने व्यथित झालेल्या सत्ताधाऱ्यांनी यावर हरकत घेतली. आमदार भास्कर जाधव यांनी या मुद्द्यावर बोलताना रवि राणा यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. अध्यक्षांना पूर्व नोटीस न देता अशा पद्धतीने आरोप करणे चुकीचे आहे असे भास्कर जाधव म्हणाले. अखेर कामकाजातून हा मुद्दा काढून टाकण्यात आला.

हेही वाचा-Amendment Bill Passed : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर

वाटल्यास मला फाशी द्या - रवि राणा

सरकार गंभीर नसून विरोधकांवर सुडाच्या भावनेतून अशा पद्धतीने गुन्हे नोंदवले जात आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, की रवि राणा दिल्लीत असताना ही घटना घडली आहे. तरीसुद्धा त्यांच्यावर ३०७ हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संधी भेटली तर विरोधी पक्षाच्या आमदारांना चिडून टाका, अशा पद्धतीची वागणूक हे सरकार करत आहे. या मुद्द्यावर बोलताना आमदार रवि राणा यांनी सभागृहात वाटल्यास मला फाशी द्या. अशा शब्दांचा प्रयोग केला होता. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांची भावना समजून घेतली पाहिजे. अशा प्रकारे पोलीस खोटे गुन्हे दाखल करत असतील तर त्यांना महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा-Devendra Fadnavis on Thackeray Government : वीज प्रश्नाच्या मुद्द्यावर सभागृहात गदारोळ; हे सरकार फक्त वसुली सरकार - देवेंद्र फडणवीस

राणेंवर सूडाच्या भावनेने करवाई!
केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्यावर मालवणी पोलीस स्टेशनमध्ये केलेली कारवाई ही सूडबुद्धीने असल्याचे फडणीस यांनी सांगितले आहे. वास्तविक ४१ ची नोटीस दिली असतानासुद्धा अशा पद्धतीने कारवाई करणे हे चुकीचे आहे. हा गुन्हा दाऊद संबंधांचा नाही तर एका स्टेटमेंटचा आहे. जे सेक्शन लावले जात आहेत ते चुकीचे आहेत. त्याचा तक्रारदाराशी थेट सामना, संवाद झालेला नाही. जवाब नोंदवताना ते सांगतात, तेथे दुसरच लिहिलं जात होते, असेही फडणवीस म्हणाले. यासाठी त्यांना अटकपूर्व जामीनसुद्धा भेटली आहे. देशाच्या महाराष्ट्राच्या इतिहासात आकसाने वागणारे सरकार म्हणून ठाकरे सरकारचे नाव नोंदविल जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

Last Updated : Mar 7, 2022, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.