ETV Bharat / city

Devendra Fadnavis Criticized NCP : राजू शेट्टी यांना संपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न होता - देवेंद्र फडणवीस - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांनी राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर राजू शेट्टी यांना संपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा ( NCP ) प्रयत्न होता, असा आरोपही फडणवीस यांनी केला. मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस संग्रहित छायाचित्र
देवेंद्र फडणवीस संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 6, 2022, 6:49 PM IST

Updated : Apr 6, 2022, 7:05 PM IST

मुंबई - माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ( Raju Shetti ) हे महाविकास आघाडीतून आता बाहेर पडले आहेत. याची घोषणा काल त्यांनी कोल्हापूर येथे केली. याबाबत बोलताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांनी राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर राजू शेट्टी यांना संपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा ( NCP ) प्रयत्न होता, असा आरोपही फडणवीस यांनी केला. मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात ते बोलत होते.

प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस

'राजू शेट्टी यांनी योग्य निर्णय घेतला' : अखेर हा ना हा ना करता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला अखेरचा रामराम केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, की मुळात महाविकास आघाडी सरकार बरोबर जाणे, हा राजू शेट्टी यांचा निर्णय चुकीचा होता. राजू शेट्टी हे नेहमी सत्तेच्या विरोधात लढत आलेले आहेत. राजू शेट्टी यांनी विशेष करून राष्ट्रवादी व शरद पवार यांना विरोध केला म्हणून त्यांच्यामागे जनता होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार बरोबर आल्याने त्यांच्या प्रतिमेवर परिणाम झाला व विश्वासार्हतेवर सुद्धा परिणाम झाला. आताचा त्यांचा निर्णय हा योग्य असून ते पुढे कदाचित थर्ड फ्रंट किंवा फोर्थ फ्रंट करतील. आमच्या विरोधात सुद्धा जातील. परंतु राजू शेट्टी यांना सोबत घेऊन संपवण्याचा प्रयत्न विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. ते आता बाहेर पडले आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राजू शेट्टींनी महाविकास आघाडीला का केला राम राम? : महाविकास आघाडी सरकारने ठरविलेल्या किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात काम केलेले नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. या कारणामुळे सुद्धा राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकारवर नाराज होते. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आले होते. परंतु तिन्ही पक्षातील नेत्यांची दिल्लीत भूमिका वेगळी दिसते. शेतकऱ्यांच्या प्रति यांना योग्य निर्णय घेता आले नाहीत. तर ऊस दर नियंत्रण समितीत शेतीशी काही संबंध नसलेले लोक घेतले. त्यामुळे सुद्धा राजू शेट्टी नाराज होते. या सर्व नाराजीच्या कारणास्तव अखेर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला राम राम केला आहे.

हेही वाचा - Ajit Pawar Reply Raj Thackeray : 'अचानक बाहेर निघायचं अन् भोंगे बंदची भाषा करायची, आतापर्यंत झोपले होते का?'

Last Updated : Apr 6, 2022, 7:05 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.