ETV Bharat / city

महाविकास आघाडी सरकार बोलतही नाही, चालतही नाही आणि फिरतही नाही - देवेंद्र फडणवीस - देवेंद्र फडणवीस महाविकास आघा़डी टीका

भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या संकल्पनेतून चालता-फिरता दवाखान्याचे आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मुंबईत लोकार्पण करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या आरोग्य  सेवेच्या योजनेचा समाचार घेतला.

devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Mar 29, 2022, 6:17 PM IST

Updated : Mar 29, 2022, 7:17 PM IST

मुंबई - भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या संकल्पनेतून चालता-फिरता दवाखान्याचे आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मुंबईत लोकार्पण करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या आरोग्य सेवेच्या योजनेचा समाचार घेत सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले. हे सरकार बोलतही नाही, चालतही नाही आणि फिरतही नाही, म्हणून हा चालता फिरता दवाखाना असल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

भाजप नेते प्रसाद लाड

अतिशय आनंदाची गोष्ट आहे विश्व हिंदू परिषदेच्या शिवकल्याण प्रतिष्ठान आणि प्रसाद लाड यांच्या मी मुंबई अभियान याच्या माध्यमातून आज या ठिकाणी चालता-फिरता दवाखाना या पद्धतीने सुरू होत आहे. विशेषता दक्षिण-मध्य मुंबईमधल्या सर्व गरीब आणि झोपडपट्टी त्यामध्ये या व्हान्स रोज त्या भागांमध्ये जाणार आहेत. आणि अतिशय चांगले प्रशिक्षित डॉक्टर्स, मेडिसिन सहित या व्हान्स घेऊन त्या तिकडे जातील. आलेल्या सर्व पेशंटला आवश्यक ती चिकित्सा देऊन त्यांना औषधे देऊन एक प्रकारे त्यांच्या दारापर्यंत आरोग्यसेवा पोचवण्याचं काम या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे.

कोरोना काळात रुग्णसेवेचे महत्व समजले - रुग्णसेवेचे महत्त्व आपण सर्वांनी कोरोनाच्या काळात बघितले आणि ऋग्नसेवा जर अपुरी पडली तर काय परिस्थिती होते या मुंबईने देखील अनुभव घेतला. अशाप्रकारे मुंबईमध्ये त्या काळामध्ये एकाच बेडवर पेशंट आणि मृतदेह हे दोन्ही झोपलेले आपण बघितले. ज्याप्रकारे रस्त्यावर मरणारी लोक बघितली, ज्याप्रकारे कोणाचीही बॉडी कोणाकडे चालली आहे, आपण त्यांचा अंतिमसंस्कार करतोय ते आपले आहेत की नाही हे ही पाहता येणार नाही अशा प्रकारची परिस्थिती बघितली. म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आरोग्यसेवेचे महत्त्व हे आपल्यासमोर अधोरेखित झालं. विशेषतः आपण बघितलं तर सर्वात जास्त गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना जर कुठल्या गोष्टीचा फार खर्च येत असेल तर तो आरोग्यसेवेचा येतो. विशेषता मुंबईसारख्या ठिकाणी अशा प्रकारे हा वाढता खर्च गरिबांना परवडणारा नाही, असे फडणवीस म्हणाले.

आरोग्या ऐवजी सुशोभीकरणावर खर्च - आताच झालेल्या अधिवेशनामध्ये महानगरपालिकेच्या दवाखान्याची परिस्थिती आम्ही मांडली. ज्या दहा प्रकारची वेगवेगळी औषधे महानगरपालिकेने विकत घ्यायची आहेत, त्यातले एकही औषध एक वर्षापासून चार महिन्यापर्यंत ही महानगरपालिका विकत घेऊ शकलेल नाही. हीच परिस्थिती सरकारच्या मेडिकल कॉलेज व रुग्णालयात आहे. रुग्णालयांमध्ये साधी औषध ही दिली जात नाहीत, त्या ठिकाणी पैसे दिले जात आहेत आणि बाहेरून आणावी लागत आहेत, अशा प्रकारची अवस्था म्हणजे एकूणच मुंबईसारख्या महानगरांमध्ये देखील आरोग्य सेवेचा बोजवारा या सरकारच्या काळात उडलेला आहे. सामान्य माणसाची अतिशय परवड होते. अतिशय ओढातान होते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भ्रष्टाचार शिगेला असतांना सामान्य माणसाच्या आरोग्यावर पैसा खर्च करण्याऐवजी हे सरकार सुशोभीकरनावर जास्तीत जास्त पैसा खर्च केला जात आहे, असा आरोप ही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

जेव्हा गरज होती तेव्हा पैसे दिले नाहीत - सरकारमध्ये असताना महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली. केंद्र सरकारने पीएम जन आरोग्य योजना सुरु केली. या दोन्ही योजना आपण महाराष्ट्रात लागू केल्या. आम्हाला अशी अपेक्षा होती की कोरोनाच्या काळामध्ये जास्तीत जास्त लोकांना आरोग्य सेवेची व्यवस्था घ्यावी लागली तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अधिकचा खर्च या काळामध्ये झाला असेल. तर त्याची गोष्ट अशी आहे की, आपण 2019 मध्ये त्या वर्षीचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा खर्च आहे तो साधारण साडे पाचशे कोटी रुपये आहे पण करोनाच्या काळात मात्र जेव्हा या योजनेची सर्वाधिक आवश्यकता होती तेव्हा या संस्थांनी साडेपाचशे ऐवजी केवळ साडेतीनशे कोटी रुपये खर्च केले आहेत, म्हणजे कुठल्याही गरिबाला सरकारच्या योजनेचा फायदा मिळालेला नाही. करोनाच्या काळात गरिबांनी आपल्या खिशातले पैसे भरून हजार रुपयांची बिले भरली आणि त्यांना आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून आत्ता या परिस्थितीमध्ये चालता फिरता दवाखाना हा लोकांसाठी विशेष करून गरिबांसाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ही सेवा गरीबापर्यंत पोहचवणार - याप्रसंगी बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी या योजनेच्या अंतर्गत समाजातील सर्व गरजवंत लोकांपर्यंत आरोग्य सेवेच्या माध्यमातून पोहचणार असून त्यांना याचा लाभ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री या प्रश्नी पूर्णतः झोपले असल्या कारणाने आम्हाला असे उपक्रम राबवावे लागत आहेत, असा खोचक टोलाही प्रसाद लाड यांनी लगावला आहे.

Last Updated : Mar 29, 2022, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.