ETV Bharat / city

ओबीसी आरक्षणासाठी 106 आमदारांचं निलंबन केलं तरी मागे हटणार नाही -देवेंद्र फडणवीस

भास्कर जाधव आणि संजय कुटे यांच्यातील बाचाबाचीनंतर भाजपच्या विधानसभेतील 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ओबीसी आरक्षणासाठी बाराच काय, 106 आमदारांचं निलंबन केलं तरी मागे हटणार नाही अशा शब्दांत राज्य सरकारवर निशाणा साधला. यापूर्वी अनेकदा सभागृहात बाचाबाची झाली, मात्र कुणाचेही निलंबन झाले नाही असेही ते म्हणाले.

ओबीसी आरक्षणासाठी 106 आमदारांचं निलंबन केलं तरी मागे हटणार नाही -देवेंद्र फडणवीस
ओबीसी आरक्षणासाठी 106 आमदारांचं निलंबन केलं तरी मागे हटणार नाही -देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jul 5, 2021, 3:17 PM IST

Updated : Jul 5, 2021, 3:34 PM IST

मुंबई : भास्कर जाधव आणि संजय कुटे यांच्यातील बाचाबाचीनंतर भाजपच्या विधानसभेतील 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ओबीसी आरक्षणासाठी बाराच काय, 106 आमदारांचं निलंबन केलं तरी मागे हटणार नाही अशा शब्दांत राज्य सरकारवर निशाणा साधला. यापूर्वी अनेकदा सभागृहात बाचाबाची झाली, मात्र कुणाचेही निलंबन झाले नाही असेही ते म्हणाले.

ओबीसी आरक्षणासाठी 106 आमदारांचं निलंबन केलं तरी मागे हटणार नाही -देवेंद्र फडणवीस

मंत्र्यांनी ही स्टोरी तयार केली

चेंबरमध्ये शिवी देणारे कोण होते हे सर्वांनी बघितले आहे. तिथे शिवसेनेच्या सदस्यांनी येऊन धक्काबुक्की केली, त्यानंतर बाचाबाची झाली. यानंतर आशिष शेलारांनी सर्वांच्या वतीने भास्कर जाधव यांची माफी मागितली आणि विषय संपवून आम्ही बाहेर आलो. मात्र त्यानंतर सरकारच्या मंत्र्यांनी आमचे आमदार सस्पेंड करण्यासाठी ही स्टोरी तयार केल्याचा आरोप फडणवीसांनी केला.

मराठा समाजाची राज्य सरकारकडून फसवणूक

यावेळी बोलताना मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर हे सरकार फेल ठरले आहे अशी टीका फडणवीस यांनी केली. मराठा समाजाला फसविण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकारचा ठराव म्हणजे, लग्न झालं नाही, मात्र पोराचं नाव ठरवून पाठविण्याचा प्रकार असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

हेही वाचा - maharashtra assembly session : आमदार संजय कुटे आणि भास्कर जाधव यांच्यात धक्काबुक्की

Last Updated : Jul 5, 2021, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.