ETV Bharat / city

Devendra Fadnavis statement : बदल्याच्या भावनेने काम करणार नाही , देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन - बाळासाहेब ठाकरे

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना भाजपा युतीच्या सरकारचे काम अतिशय चांगले आणि दमदार होईल. गेल्या काही काळात अनेक अनुभव आले असले तरी आम्ही बदल्याच्या भावनेने काम करणार नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy cm Devendra Fadnavis )फडणवीसयांनी सभागृहात केले.

Deputy Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jul 4, 2022, 1:48 PM IST

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी सरकारमधील विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Deputy CM )यांनी त्यांच्या अभिनंदनचा ठराव सभागृहात मांडला. यावेळी त्यांनी शिवसेना भाजपा युतीचे सरकार राज्यात स्थापन झाल्याचे जाहीर केले हा जनतेच्या मनातला कौल होता आम्हाला दूर सारून विचित्र आघाडी करण्यात आली मात्र शेवटी जनतेच्या मनातील सरकार आज स्थापन होत आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते विश्वास दर्शक ठराव संमत झाल्यानंतर अभिनंदनच्या ठरावावर ते बोलत होते

सच्चा शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले-ठाणे जिल्ह्यातील किसन नगर येथील एक शाखाप्रमुख एकनाथ शिंदे आपल्या कार्याने मोठा होतो धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली त्याचे त्यांना फळ मिळत गेले 2004 पासून त्यांनी चार वेळा सतत आमदारकी मिळवली आहे अतिशय निष्ठावान आणि सच्चा शिवसैनिक असलेल्या एका शिवसैनिकाला आज मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याचे पाहून आपल्याला आनंद होत आहे असे फडणवीस यावेळी म्हणाले.

आंदोलनांचीदखल घेतली पाहिजे :
गेल्या अडीच वर्षात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या किंवा आवाज उठवणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचा धडाका लावला होता काही लोक आंदोलन करतात त्यांची आंदोलने योग्य असतात त्याची दखल घेतली गेली पाहिजे त्यांच्यावर कारवाई करणे योग्य नाही सरकारने सूडबुद्धीने वागू नये हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणणाऱ्या खासदाराला बारा दिवस तुरुंगात डांबण्यात येते ही अतिशय निंदनीय बाब आहे असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

शिवसेनेचे खरे शिवसैनिक :
राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिशय संवेदनशील व्यक्ती आहेत ते लोकांमध्ये राहणाऱ्या आहेत लोकांची कामे करणारी व्यक्ती आहे ते शिवसेनेचे खरे शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray)यांच्या विचारांवर चालणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या मागे ठामपणे उभे राहून राज्याच्या विकासाचे निर्णय घेणार. माझ्या दोघांमध्ये कुठेही संघर्ष दिसणार नाही आम्ही कुरघोडीचे राजकारण करणार नाही तर बदल्याच्या भावनेने काम करणार नाही सर्वांना सामावून विकासाचेच राजकारण करणार असा ठाम विश्वास फडणवीस यांनी सभागृहात व्यक्त केला.

मी पुन्हा आलो: निवडणुकीदरम्यान मी एक कविता म्हटली होती की मी पुन्हा येईन म्हणून त्या माझ्या कवितेची खूप टिंगल टवाळी उडवण्यात आली पण अखेरीस मी पुन्हा आलो आहे आणि आता एकटा नाही तर शिंदे यांना घेऊन आलो आहे असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.