ETV Bharat / city

४ महिन्यात बदलले वरळीतील (जांबोरी) महात्मा गांधी मैदानाचे रुपडे - मुंबई महानगर पालिका बातमी

जांबोरीच्या १ लाख ४५ हजार चौरस फुटांच्या विस्तीर्ण मैदानात विविध क्रीडा उपयोगी सुविधा आणि सुधारणा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार या मैदानात आता विविध सुधारणा प्रत्यक्षात आल्या असून आणखी काही सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या मैदानात करण्यात आलेली व येत असलेली कामे ‘जिल्हा नियोजन समिती’च्या व महानगरपालिकेच्या प्रत्येकी ७५ लाख रुपये; यानुसार उपलब्ध झालेल्या दीड कोटी रुपयांच्या संयुक्त निधीमधून करण्यात येत आहेत.

development of mahatma gandhi maidan in worlis Jamboree in four months
४ महिन्यात बदलले वरळीतील (जांबोरी) महात्मा गांधी मैदानाचे रुपडे
author img

By

Published : Feb 24, 2022, 5:18 PM IST

मुंबई - मुंबईतील अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार असणारे वरळीतील ‘महात्मा गांधी मैदान’ हे ‘जांबोरी मैदान’ या नावानेही मुंबईकरांना सुपरिचित आहे. गेल्या काही महिन्यात महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागाच्या पुढाकाराने या मैदानात विविध क्रीडा प्रकारांना पूरक अशा सुधारणा करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे या मैदानास एक अनोखे व अभिनव रुपडे बहाल झाले आहे. ‘जिल्हा नियोजन समिती’च्या व महानगरपालिकेच्या प्रत्येकी ७५ लाख रुपये; यानुसार उपलब्ध झालेल्या दीड कोटी रुपयांच्या संयुक्त निधीमधून करण्यात येत आहेत.

स्वतंत्र क्रीडांगण विकसित -
मैदानात तब्बल १५ हजार चौरस फुटांचे एक स्वतंत्र क्रीडांगण विकसित करण्यात आले आहे. त्याचबरोबर कबड्डी - बॅडमिंटनसह इतरही खेळ खेळता येतील असे कोर्ट, फुटबॉल मैदान, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी स्वतंत्र स्केटींग ट्रॅक, पदपथ, लाकडी उपकरणे असणारी खुली व्यायामशाळा, बसण्यासाठी बाक, सूर्यास्तानंतर मैदान उजळून निघावे यासाठी पर्यावरणपूरक एलईडी दिव्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, एलईडी दिवे असणारे शोभिवंत झोके, एलईडी दिव्यांचा वापर करुन तयार करण्यात आलेले आकर्षक नंबर गेम यासारख्या विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे जांभोरी मैदानाचे रुपडे अधिक आकर्षक करणाऱ्या या सुधारणा ‘जी दक्षिण’ विभागाने अवघ्या ४ महिन्यांच्या विक्रमी वेळेत केल्या आहेत. तसेच याबाबत आवर्जून नोंद घ्यावी, अशी बाब म्हणजे मैदानाची कामे सुरु असताना मैदानाच्या खाली सुमारे सव्वा लाख लीटर क्षमतेची ब्रिटिशकालीन पाण्याची टाकी आढळून आली आहे. या टाकीचा उपयोग आता वर्षा जल संचयनासाठी करण्यात येणार आहे.

दीड कोटी रुपयांच्या निधीमधून काम -
जांबोरी मैदानातील या सुधारणांबद्दल अधिक माहिती देताना ‘जी दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी सांगितले की, या १ लाख ४५ हजार चौरस फुटांच्या विस्तीर्ण मैदानात विविध क्रीडा उपयोगी सुविधा आणि सुधारणा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार या मैदानात आता विविध सुधारणा प्रत्यक्षात आल्या असून आणखी काही सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या मैदानात करण्यात आलेली व येत असलेली कामे ‘जिल्हा नियोजन समिती’च्या व महानगरपालिकेच्या प्रत्येकी ७५ लाख रुपये; यानुसार उपलब्ध झालेल्या दीड कोटी रुपयांच्या संयुक्त निधीमधून करण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्याचे वित्त मंत्री अजित पवार व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच या मैदानाची पाहणी केली व तेथे सुरू असलेल्या सुधारणांबाबत समाधान व्यक्त केले. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उप आयुक्त (परिमंडळ २) हर्षद काळे यांच्या नेतृत्वात मैदानातील सुधारणा करण्यात आली आहे. वरळीतील ऐतिहासिक जांबोरी मैदानात लवकरच खुले वाचनालय व त्यावर व्ह्युईन्ग डेक, योग केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा, लहान मुलांसाठी खेळणी इत्यादी सुविधादेखील लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ही कार्यवाही सध्या प्रगतीपथावर असल्याचेही शरद उघडे यांनी सांगितले.

या आहेत उपलब्ध सुविधा
१. मैदानावर १४ ठिकाणी पाण्याचे फवारे
२. मैदानाखाली पाण्याची टाकी
३. मैदानाच्या खाली वर्षा जल संचयन यंत्रणा
४. लाकडी उपकरणे असलेली खुली व्यायाम शाळा
५. खुले योग केंद्र
६. लवकरच सुरू होणार मल्लखांब सराव
७. मल्टी-स्पोर्टस् रबरमॅट कोर्ट
८. स्केटिंग ट्रॅक
९. जॉगिंग ट्रॅक
१०. मैदानाच्या सभोवती जाळी
११. आकर्षक एलईडी दिवे असलेले झोके (एलईडी स्विंग)
१२. एलईडी दिवे असलेल्या नंबर गेम
१३. सूर्यास्तानंतर प्रकाशासाठी एलईडी दिव्यांचे वैशिष्ट्यपूर्ण खांब
१५. लहान मुलांसाठी खेळणी
१६. व्ह्युवींग डेक सह खुले वाचनालय
१७. मैदानाच्या सभोवती क्रीडा शिल्पे
१८. मैदानात हवा खेळती रहावी, यासाठी वैशिष्ट्यपूर्ण ग्रील
१९. वैशिष्ट्यपूर्ण इल्युजनरी पेंटिंग व प्रवेशद्वार
२०. पिण्याच्या पाण्याची व प्रसाधनगृहांची सुविधा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.