मुंबई - परळ येथील भोईवाडा पोलीस कॅम्पसमध्ये असलेल्या जरीमरी माता मंदिर परिसरातील पडिक जागेत 'देवराई' फुलवण्यात आली आहे. ब्रिदींगरुट्स या पर्यावरणप्रेमी संस्थेने ही देवराई फुलवली आहे.
हेही वाचा... 'वाडिया रुग्णालयातील गैरप्रकाराबाबत मंगळवारी बैठक घेऊन निर्णय घेऊ'
महाराष्ट्रातील विविध भागातून रोप आणून या देवराईत दुर्मिळ आणि औषधी, अशा शंभराहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. दुर्मिळ वृक्ष संवर्धन करणे आणि परिसरात शुद्ध हवा निर्माण करणे, हा यामागचा हेतू यामागे असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. भारतीय परंपरेतून लोप पावत चाललेल्या देवराईला आता पर्यावरण स्नेही संस्था राखताना पाहायला मिळत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून या जागेत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यात औषधी वनस्पती, विविध मसाल्यांच्या झाडांचा समावेश आहे, असे ब्रिदींगरुट्सच्या सदस्यांनी सांगितले.
हेही वाचा... दोन पेंशन दोन पगार; वाडिया रुग्णालय ट्रस्टचा मनमानी कारभार
येथील देवराईत लावण्यात आलेल्या दुर्मिळ झाडांमध्ये बाभूळ, पांढरा, पांगारा, बहावा, चंपा, सफेद कांचन, पळस, रक्तचंदन, कनेर, कागदी, लिंबू, मधूनाशिनी, जारूळ, शंकासुर, मिरगुंड, गुंज, चेहरा, कापूर अशा अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. विविध औषधी वनस्पती व फळझाडे यांमुळे येथे भविष्यात स्थलांतरित पक्ष्यांना निवाऱ्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार असल्याचे पर्यावरणप्रेमींंनी म्हटले आहे.
हेही वाचा... 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तकाचा वाद, हिंगोलीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध
मुंबई महापालिका राबवत असलेल्या 'मिया वाकी' या संकल्पनेसोबतच 'देवराई' ही भारतीय निसर्ग संस्कृतीचा भाग असलेली संकल्पना महापालिकेने अर्बन फॉरेस्टसाठी राबवावी, अशी मागणी ब्रिदींगरुट्स संस्थेच्या निसर्गप्रेमींनी व्यक्त केली.