ETV Bharat / city

मुंबई- रुग्णांच्या संख्येत वाढ होऊनही कोविड सेंटरमधील 60 टक्के खाटा रिकाम्या - Mumabai Jumbo COVID centre

मुंबईत सध्या रुग्ण संख्या वाढत असली तरी त्यात 97 टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. या रुग्णांच्या घरात वेगळे शौचालय आणि खोली असल्यास त्यांना घरीच क्वारंटाईन केले जाते. घरी सुविधा नसलेल्या रुग्णांना कोविड सेंटर किंवा इतर आजार असल्यास जंबो कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाते.

Mumbai corona update
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Mar 15, 2021, 5:46 PM IST

मुंबई - कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष झाल्यानंतर मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत असताना यातील बहुसंख्य रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे रुग्णालय आणि कोविड सेंटरमधील सुमारे 60 टक्के खाटा रिक्त आहेत. रुग्णांना सोयी व सुविधा देऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पालिका सज्ज असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत 14 मार्च रोजी कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 43 हजार 947 वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा 11 हजार 531 वर तर रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 17 हजार 579 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 13 हजार 247 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के आहे. तर रुग्ण संख्या दुप्पटीचा कालावधी 176 दिवस इतका आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 35 लाख 58 हजार 359 चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा-नवरी मिळे नवऱ्याला! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युवकावर लग्नाच्या प्रस्तावांचा अक्षरश: वर्षाव

५० टक्क्यांहून अधिक खाटा रिकाम्या -
मुंबईत रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून डिसीएचसी व सीसीसी 2 जंबो कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. या कोविड सेंटरमध्ये 13 हजार 585 खाटा आहेत. त्यापैकी 5,495 खाटांवर रुग्ण आहेत. तर 8 हजार 90 खाटा रिक्त आहेत. याचाच अर्थ 61 टक्के खाटा रिक्त आहेत. कोविड सेंटरमधील डिसीएचसी या प्रकारात गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी 5 हजार 888 खाटा आहेत. त्यापैकी 3 हजार 841 म्हणजेच 62 टक्के खाटा रिक्त आहेत. तर 2 हजार 247 म्हणजेच 38 टक्के खाटांवर रुग्ण आहेत. डिसीएचमध्ये गंभीर आजार नसलेल्या रुग्णांसाठी 7 हजार 110 पैकी 4 हजार 117 म्हणजेच 58 टक्के खाटा रिक्त आहेत. त्यातील 2 हजार 993 म्हणजेच 42 टक्के खाटांवर रुग्ण आहेत. तर सीसीसी 2 मध्ये 587 पैकी 332 म्हणजेच 57 टक्के खाटा रिक्त आहेत तर 255 म्हणजेच 43 टक्के खाटा भरलेल्या आहेत.

हेही वाचा-देशद्रोह खटला : न्यायालयात हजर कन्हैया अन् उमर खालिद, अन्य सात जणांना जामीन मंजूर, वाचा सविस्तर

रुग्णालयातील खाटा रिक्त -
पालिका सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 12 हजार 998 खाटा आहेत. त्यापैकी 5 हजार 240 खाटांवर रुग्ण आहेत. तर 7 हजार 758 खाटा रिक्त आहेत. 1 हजार 536 आयसीयू खाटा आहेत. त्यावर 845 रुग्ण आहेत. तर 691 आयसीयूच्या खाटा रिक्त आहेत. 8 हजार 22 ऑक्सिजनच्या खाटा आहेत. त्यावर 2 हजार 668 रुग्ण असून 5 हजार 354 खाटा रिक्त आहेत. 944 व्हेंटिलेटर असून 539 रुग्ण आहेत. तर 405 व्हेंटिलेटर रिक्त आहेत.

हेही वाचा-नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; पोलीस आयुक्तांचा इशारा

13 हजार 247 सक्रिय रुग्ण -
मुंबईत 14 मार्चच्या आकडेवारीनुसार सध्या 13 हजार 247 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 8 हजार 201 लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. तर 4 हजार 595 लक्षणे असलेले, मात्र प्रकृती स्थिर असलेले रुग्ण आहेत. तर 451 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

म्हणून रुग्णालयांमध्ये खाटा रिक्त...
मुंबईत सध्या रुग्ण संख्या वाढत असली तरी त्यात 97 टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. या रुग्णांच्या घरात वेगळे शौचालय आणि खोली असल्यास त्यांना घरीच क्वारंटाईन केले जाते. घरी सुविधा नसलेल्या रुग्णांना कोविड सेंटर किंवा इतर आजार असल्यास जंबो कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाते. जे रुग्ण कोरोना नियमांचे पालन करत नाहीत, त्यांनाही कोरोना सेंटरमध्ये भरती केले जाते. सध्याच्या परिस्थितीत लक्षणे नसलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याने रुग्णालय आणि कोविड सेंटरमधील खाटा रिक्त आहेत. गरज पडल्यास पालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये एक अशी 24 कोरोना सेंटर उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.