ETV Bharat / city

मराठी रेल्वे कर्मचाऱ्यांना डावलले, परीक्षेत सर्वाधिक गुण घेऊनही वाणिज्य निरीक्षक पदापासून वंचित - Mumbai Railway Department

अनेक तरुण भारतीय रेल्वे सेवेत मेहनत घेऊन दाखल होतात. त्यानंतर विभागीय पदोन्नती परीक्षा देऊन ते अनेक मोठ्या पदावरही रुजू होतात. रेल्वे नियमानुसार, कमर्शियल अप्रेंटिस परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवाराला वाणिज्य निरीक्षक या पदावर निवड केली जाते. मात्र, पश्चिम रेल्वेकडून सर्वाधिक गुण मिळविण्याऱ्या उमेदवाराला डावलण्यात आल्याचे समोर आले आहे.

रेल्वेचा फाईल फोटो
रेल्वेचा फाईल फोटो
author img

By

Published : Jul 4, 2021, 6:59 PM IST

मुंबई - प्रचंड मेहनत करुन अनेक तरुण भारतीय रेल्वे सेवेत दाखल होतात. त्यानंतर विभागीय पदोन्नती परीक्षा देऊन ते अनेक मोठ्या पदावरही रुजू होतात. मात्र, या पदोन्नती परिक्षेत मराठी तरुणांना डावलल्याची धक्कादायक माहिती ईटीव्ही भारत'च्या हाती आली आहे. पदोन्नतीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण घेऊन, नियमांना बगल देऊन वाणिज्य निरीक्षक पद दुसऱ्याला देण्यात आले आहे. त्यामुळे मराठी कर्मचाऱ्यांना पश्चिम रेल्वे डावलत आहेका? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय आहे परीक्षा?

शासकीय विभागात कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी विभागीय पातळीवर अनेक परीक्षा घेण्यात येतात. परीक्षांच्या गुणांवर आणि योग्यतेनुसार त्या कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. अशीच परीक्षा पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून घेण्यात आली. या विभागाकडून नुकतेच ५६ जागेसाठी कमर्शियल अप्रेंटिस परीक्षा घेण्यात आली होती. विशेष म्हणजे या ५६ जागेपैकी एक जागा वाणिज्य निरीक्षक आणि उर्वरित जागा बुकिंग क्लर्कसाठी आहे. रेल्वे नियमानुसार, कमर्शियल अप्रेंटिस परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवाराला वाणिज्य निरीक्षक या पदावर निवड केली जाते. मात्र, पश्चिम रेल्वेकडून सर्वाधिक गुण मिळविण्याऱ्या उमेदवाराला डावलण्यात आले आहे.

मराठी रेल्वे कर्मचाऱ्यांना डावलले

पश्चिम रेल्वेचा वाणिज्य विभागातील परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही पदोन्नतीसाठी कमर्शियल अप्रेंटिस परीक्षा दिली. या परीक्षेत ५६ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत वाणिज्य निरीक्षकाची जागा जनरल उमेदवारांसाठी राखीव होती. मात्र, जनरल आरक्षणामध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवाराची वाणिज्य निरीक्षक निवड होणे अपेक्षित होते. मात्र, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नियम डावलून गुण तालिकेत १३ वा क्रमांक असलेल्या उमेदवाराची वाणिज्य निरीक्षकपदी निवड केली आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांवर हा अन्याय झाल्याचे बोलले जात आहे.

रेल्वेकडे उत्तर नाही?

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता, माझ्याकडे याप्रकरणाची माहिती नाही. माहिती घेऊन तुम्हाला कळवतो, असे त्यांनी ई़टीव्ही भारतशी बोलताना सांगितले. तर, पश्चिम रेल्वेचे वाणिज्य विभागातील परिक्षा उतीर्ण झालेल्या उमेदवाराला याबाबत विचारले असता, वाणिज्य निरीक्षकाच्या पदावर रेल्वेने नियमांची अंमलबजावणी केली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अशी झाली निवड प्रक्रिया

पश्चिम रेल्वेकडून कमर्शियल अप्रेंटिस परीक्षा ९ जून २०१८ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १९ ऑगस्ट २०१८ रोजी जाहीर करण्यात आला होता. नंतर परीक्षांचे गुण, सेवा पुस्तकाच्या अनुभव आणि शैक्षणिक अर्हता लक्षात घेता ४ ऑक्टोबर २०१९ रोजी फायनल निडवयादी रेल्वेकडून जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर पात्र उमेदवारांना दोन वर्षाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पोस्टिंग देण्यात आली आहे. मात्र, या पोस्टिंगमध्ये उच्च शिक्षित मराठी तरुणांना डावलण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.