मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका दोन आठवड्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले ( Supreme Court On Local Body Elections ) आहे. त्यानंतर या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या जात असल्या तरी, दोन दिवसापूर्वी राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा प्रयत्न असल्याचं संकेत शरद पवार यांनी दिले ( Sharad Pawar On Local Body Elections ) होते. आज यावर भाष्य करताना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच करण्याचा प्रयत्न आहे. मात्र अनेक वेळा स्थानिक पातळीवर निर्णय अवलंबून असतात. त्यामुळे याबाबतचा निर्णय घेत असताना स्थानिक पातळीवरील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे असंही अजित पवार आज मुंबईचे प्रदेश कार्यालयात ( NCP Mumbai Office ) जनता दरबारनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ( Ajit Pawar On Local Body Elections )म्हणाले.
झाकली मूठ सव्वा लाखाची, नाना पटोले यांना टोमणा : भंडारा गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक पातळीवर आमच्याशी विश्वास घात केला. आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप नाना पटोले यांनी केला होता. यावर अजित पवार म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला असं वक्तव्य हास्यास्पद आहे. नाना पटोले हे आधी कोणत्या पक्षात होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले, भाजपमध्ये होते मग आम्ही त्यांनी पाठीत खंजीर खुपसला असं म्हणायचं का? असा उपरोधक प्रश्न अजित पवार यांनी विचारला. प्रत्येक पक्ष आपल्या परीने काम करत असतो. महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करतोय. परंतु राज्यात निर्णय घेताना राज्य पातळीवर निर्णय घेतले जातात. तसेच जिल्हा पातळीवर त्या परिस्थितीत निर्णय घेतले जातात. काँग्रेसने सुद्धा काही ठिकाणी जिल्हा पातळीवर भाजपबरोबर हात मिळवणी केली आहे. पण आम्ही त्याला महत्त्व देत नाही. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. शरद पवार यांनी महाविकास आघाडीतून आगामी निवडणुकांलढवयात यासाठी बैठक घेतली होती. मात्र स्थानिक पातळीवर त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आजी-माजी आमदार, नेत्यांचे मत विचारात घेतली जातात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून पंधरा वर्षे आघाडी सरकार चालवले. त्या काळातही अनेक जिल्ह्यांमध्ये एकमेकांच्या विरोधात दोन्ही पक्षांनी काम होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षातील कार्यकर्ते किंवा नेते विरोधी पक्षात जाऊन त्यांची ताकद वाढवणे पेक्षा मित्र पक्षाची ताकद वाढत असेल तर इतर पक्षाने वाईट वाटून घेऊ नये असा सल्लाही अजित पवारांनी यावेळी नाना पटोले यांना दिला.
आम्ही उत्तर प्रदेशमध्ये कार्यालय उघडू : उत्तर प्रदेश सरकार मुंबईत आपले कार्यालय सुरू करणार आहे. यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात असले तरी, कोणी कुठे कार्यालय काढावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. दिल्लीत महाराष्ट्र सदन किंवा इतर राजाची सदन आहेत. मुंबईतही इतर राज्याची सदने काढण्यात आली आहेत. महाराष्ट्रात आणि मुंबईत पूर्ण भारतातून बरेच लोक येत असतात. उत्तरप्रदेश नॉर्थ-साऊथ बिहारचे लोक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे वेगळे धोरणासाठी उत्तर प्रदेश सरकारने याबाबत निर्णय घेतला असेल तर, यामुळे घाबरण्याचं कारण नाही. महाविकास आघाडी सरकारला वाटले तर, ते उत्तर प्रदेशमध्ये देखील आपलं कार्यालय काढू शकत. या मुद्द्यावरून गैरसमज किंवा घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी यावेळी दिले.
सुरक्षेबाबत सर्व अधिकार राज्यस्तरीय कमिटी घेते : राज ठाकरे यांना धमकीच पत्र आल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यातील कोणत्याही व्यक्तीला सुरक्षित वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्याचे काम राज्य सरकार आणि पोलिसांचे आहे. त्यामुळे गृहमंत्री निश्चित यामध्ये लक्ष घालतील. पत्र नेमकं कुठून आलं, कोणी लिहिलं, त्यामागचा हेतू नेमका काय याचा तपास केला जाईल.
शरद पवारांवर आगपाखड करण्याचा प्रयत्न : शरद पवार यांचा हिंदू देव देवताच्या बाबत बोलणारा याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र शरद पवार यांच्यावर विरोधकांकडून केवळ आगपाखड करण्यासाठी असा व्हिडिओसमोर आणला जातोय. शरद पवार यांच्या पूर्ण भाषणात एका कवितेचा दाखला दिला होता. या कवीने आपल्या कवितेत काय म्हटलं आहे हे शरद पवार यांनी आपल्या भाषणातून सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हे शरद पवार चालवत असल्याचा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी काढला होता. मात्र शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरे चालवत होते आता भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांचा करिष्मा चालवता शरद पवार यांच्यामुळेच आमच्या सारख्या नेत्यांना संधी मिळेल, असा टोलाही अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांना लगावला.
हेही वाचा : Ajit Pawar On Raj Thackeray : 'बोलणाऱ्याचे जेवढे वय, तेवढे पवार साहेबांचे राजकारणातील आयुष्य'; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला