ETV Bharat / city

खुशखबर! हॉटेलमधील पदार्थ घरपोच मिळणार.. अंडी, चिकन, मटण, मासेविक्रीला परवानगी - hotels in mumbai

जनतेच्या सोयीसाठी हॉटेल व्यवसायिकांना त्यांचे किचन सुरू ठेवून घरपोच खाद्यपदार्थ देण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. याचसोबत स्वच्छतेबाबतचे निकष पाळण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

ajit pawar on corona
जनतेच्या सोयीसाठी हॉटेल व्यवसायिकांना त्यांचे किचन सुरू ठेवून घरपोच खाद्यपदार्थ देण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे.
author img

By

Published : Mar 27, 2020, 6:15 PM IST

मुंबई - जनतेच्या सोयीसाठी हॉटेल व्यवसायिकांना त्यांचे किचन सुरू ठेवून घरपोच खाद्यपदार्थ देण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. मात्र, खाद्यपदार्थ बनवणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील, असे पवार म्हणाले.

कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही, कोरोनाबाबत आवश्यक स्वच्छता व सुरक्षितता बाळगावी लागणार असल्याचे ते म्हणाले. गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, असे पवारांनी सांगितले.

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी थांबलेली नाही. शेतकरी बायोमेट्रीकसाठी तयार नाहीत; आणि शासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी व्यग्र असल्याने या प्रक्रियेत काही प्रमाणात संथपणा आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही. तसेच साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे. मात्र उसतोड मजूरांच्या जेवणाची काळजी संबंधित कारखान्यांना घ्यावी लागणार असल्याची जाणीव त्यांनी करून दिली.

राज्य सरकाने लष्कराच्या मदतीसाठी लिहिलेले पत्र हे केवळ लष्कराची वैद्यकीय मदत मिळण्यापुरते मर्यादित असल्याचा खुलासाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.