मुंबई- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३० एप्रिल पर्यंत मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे राज्यातील टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या संघटनांनी राज्य सरकारकडे 10 हजार रुपयांची आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
शिक्षा टॅक्सीसाठी घेतलेले कर्ज माफ करावे-
सरकारने गेल्या वर्षी सहा महिने रिक्षा बंद ठेवण्यास सांगितल्याने रिक्षा, टॅक्सी चालक कर्जबाजारी झाले आहेत . त्यात आता दररोज रेस्टॉरंट, बार, दुकाने, थिएटर्स, मॉल आणि इतर मनोरंजनाची साधने बंद ठेवण्यात येणार आहेत . विशेष म्हणजे, सायंकाळी आठ वाजल्यानंतर गार्डन होतो पाट्या बंद असणार आहेत . सर्व खासगी कार्यालयांना वर्क फॉम होमचे आदेश देत सरकारी कार्यालयेही 50 टक्के क्षमतेने चालणार आहेत . अशा परिस्थितीत रिक्षा आणि टॅक्सी ला 70 टक्के व्यवसायाला मुकावे लागणार आहे . कारण लोक घरीच अधिक असतील, प्रवासी मिळणार नाहीत . त्यामुळे सरकारने नुकसान भरपाई म्हणून दर महिन्याला चालकांच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा करावेत , तसेच टॅक्सी आणि रिक्षासाठी घेतलेले कर्ज माफ करावे अशी मागणी मुंबईतील टॅक्सी ऑटोरिक्षा मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव तसेच स्वाभिमानी रिक्षा टॅक्सी चालक युनियनचे अध्यक्ष के. के. तिवारी यांनी केली आहेत.
दिल्ली सरकारप्रमाणे मदत करा-
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी देशासह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलेला होता. त्यामुळे, टॅक्सी आणि रिक्षा चालक, मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता सतत इंधन दरवाढीमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा व्यवसाय मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे, राज्य सरकारने मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या समस्यांना लक्षात घेत टॅक्सी आणि रिक्षाची चालकांना मदत करणे गरजेचे आहेत. गेल्या वर्षी दिल्लील टॅक्सी रिक्षा चालकांना दिल्ली सरकारने आर्थिक मदत करण्यात आलेली होती. मात्र महाराष्ट्र शासनाने राज्यातील टॅक्सी रिक्षा चालकांना मदत केली नव्हती. त्यामुळे आता मिनी लॉकडाऊन काळात राज्य सरकारने मदत करावीत अशी मागणी स्वाभिमान टॅक्सी रिक्षा चालक युनियनचे अध्यक्ष के.के तिवारी केली आहे.
हेही वाचा- आम्ही फक्त दोन दिवसांच्या टाळेबंदीला सहमती दर्शवली होती - फडणवीस