मुंबई - मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीपूर्वी बोनस म्हणजेच सानुग्रह अनुदान दिले जाते. (२०२०) मध्ये पालिका कर्मचाऱ्यांना १६ हजार ५०० इतका बोनस देण्यात आला. कोरोना काळात चांगले काम केल्याने मुंबईमधील प्रसार आटोक्यात आला. यासाठी २०२१ मध्ये बोनसच्या रकमेत भरघोस वाढ करून २० हजार इतका बोनस देण्यात आला आहे. यंदा पालिका कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये बोनस द्यावा अशी मागणी पालिका कर्मचाऱ्यांच्या युनियन आणि कृती समितीकडून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांकडे बैठक - आज पालिका कर्मचारी संकघटना कृती समिती आणि आयुक्त असलेले प्रशासक इकबाल सिंग चहल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत २५ हजार रुपये बोनस देण्याबाबत चर्चा झाली. आयुक्तांनी २० हजार रुपये बोनस देण्यासाठी सकारात्मकता दाखवली आहे. बोनसबाबत येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत बोनसचा निर्णय होईल अशी माहिती कृती समितीचे ऍडव्होकेट प्रकाश देवदास यांनी दिली आहे.