ETV Bharat / city

'प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत वाढवण्याची मागणी मान्य'

author img

By

Published : Jun 30, 2020, 5:48 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये याविषयी पंतप्रधानांना योजनेस मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.

cm
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला उद्देशून भाषण केले त्यामध्ये ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये याविषयी पंतप्रधानांना योजनेस मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. या योजनेत तांदूळ आणि चणा डाळ देण्यात येत असून, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सुमारे 7 कोटी लोकांना याचा लाभ होणार आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाला उद्देशून झालेल्या भाषणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील राज्याला संबोधित करत असतात. आता आजच्या पंतप्रधानांच्या भाषणानंतर मुख्यमंत्रीही बोलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणेची सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा -

अनलॉक २.०ची घोषणा, गरीब कल्याण योजनेचा दिला हिशेब; चीनबाबत मौनच!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.