ETV Bharat / city

अंबानींना धमकी प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तिहार तुरुंगात तपास

या प्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याची माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला दिली. यानंतर स्पेशल सेलचे पथक गुरूवारी तिहारमध्ये दाखल झाले.

अंबानींना धमकी प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तिहार तुरुंगात तपास
अंबानींना धमकी प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तिहार तुरुंगात तपास
author img

By

Published : Mar 12, 2021, 8:55 AM IST

नवी दिल्ली : उद्योजक मुकेश अंबानींच्या घरासमोर स्कॉर्पिओत स्फोटके आढण्याच्या प्रकरणाचा संबंध थेट तिहार तुरूंगाशी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची जबाबदारी घेणाऱ्या जैश-उल-हिंदचा टेलिग्राम ग्रुप तिहारमधील एका मोबाईल नंबरवरून तयार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी तपासासाठी स्पेशल सेलचे पथक तिहार प्रशासनाची मदत घेत आहे.

स्पेशल सेलकडून तिहार तुरूंगात तपास

या प्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याची माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला दिली. यानंतर स्पेशल सेलचे पथक गुरूवारी तिहारमध्ये दाखल झाले. या प्रकरणी संबंधित मोबाईलचा शोध स्पेशल सेलकडून घेतला जात आहे. दरम्यान, तपासात तुरूंगातील एका बराकमध्ये छापेमारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. एका दहशतवाद्याच्या बराकमधून एक मोबाईल जप्त केल्याचीही माहिती सूत्रांकडून समजते आहे.

काय आहे प्रकरण?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घरासमोर स्कॉर्पिओत स्फोटके आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. कंबाला हिल परिसरातील अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या गाडीत जिलेटिन स्फोटकांच्या 20 कांड्या पोलिसांना सापडल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणाचा तपास क्राईम ब्राँचकडे सोपविण्यात आला होता.

हेही वाचा - अँटिलियाबाहेर स्फोटके प्रकरणी एनआयएचा तपास सुरू!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.