मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे सेनेत दोन गट पडले आहेत. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थी करत आहेत. ( Chief Minister Eknath Shinde ) आज (दि. 13 जुलै)रोजी सय्यद यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन, मातोश्रीवर येऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची विनंती केली. गुरू पौर्णिमेच्या निमित्त सय्यद यांनी भेट घेतल्याचे सांगण्यात येते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट - एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे, अशी शिवसेनेच्या तसेच शिंदे गटाच्या काही नेत्यांची इच्छा आहे. ( Shiv Sena leader Deepali Syed ) दिपाली सय्यद सातत्याने ही मागणी करत आहेत. आज गुरुपौर्णिमेचे निमित्त लक्षात घेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत, त्यांना पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत येण्याची विनंती केली आहे. शिंदेसाहेब तुम्ही परत मातोश्रीवर या, एकदा उद्धव ठाकरे यांच्याशी बोला सगळे नीट होईल, अशी विनंती केली. ट्विटरवरुन सय्यद यांनी माहिती दिली आहे.
आलात तर दरवाजे बंद दिसणार नाहीत - दोन दिवसांपूर्वी दिपाली सय्यद यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या फोटोवरून बंडखोर आमदारांना खडे बोल सुनावले होते. शिवसेनेच्या आमदारांनो बॅनरवर पक्षप्रमुखांचा फोटो लावल्याने हिंदुत्व कमी होणार नाही. मातोश्रीच्या वाटेला शिंदे यांना घेऊन आलात तर दरवाजे बंद दिसणार नाही. तुम्ही शिवसैनिक आहात, मग मातोश्रीला विसरून कामकाज करणार का? मातोश्रीच्या बैठकीला शहा-फडणवीसांनी येण्याची वाट बघणार का?, असे ट्विट करत त्यांनी निशाणा साधला होता.
हेही वाचा - शिवसेनेचा ताक फुकून पिण्याचा निर्णय! मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने खासदारांचे बंड थांबणार का? वाचा, सविस्तर