मुंबई - सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना काल अटक केली होती. अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, मुंबईतील मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये काल दिल्लीत अटक केल्यानंतर कोचर यांना आज मुंबईत आणण्यात आले.
मुंबईतील ईडी कार्यालयात आज दीपक कोचरला हजर करण्यात आले आहे. ईडीचे अधिकारी त्यांची येथे कसून चौकशी करतील.
काय आहे प्रकरण -
2009 ते 2011 या दरम्यान व्हिडीओकॉनचे चेअरमन वेणूगोपाल धूत व दीपक कोचर यांना नियम धाब्यावर बसून तब्बल 1875 कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर करण्यात आलेला आहे. यासंदर्भात सीबीआयकडून गुन्हा नोंदवण्यात आलेला असून ईडीकडून सुद्धा तपास केला जात आहे.
चंदा कोचर यांच्याविरोधात आयसीआयसीआय बँकेकडून निवृत्त न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्णा समिती चौकशीसाठी नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालानंतर चंदा कोचर यांच्यावर फेब्रुवारी 2019मध्ये बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. त्याविरोधात नौव्हेंबर 2019मध्ये चंदा कोचर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती, जी फेटाळण्यात आली आहे.