ETV Bharat / city

CM Eknath Shinde: एनडीएच्या बैठकीला शिंदे गटाचे केसरकर लावणार हजेरी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. तसेच एनडीएतून बाहेर पडत आव्हान दिले. एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी बंडखोरी करत शिवसेनेला ( Shivsena ) हादरा देत, दिल्ली दरबारी जवळीक वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde
author img

By

Published : Jul 13, 2022, 12:41 PM IST

मुंबई - राष्ट्रपती पदाची जवळ आल्याने भाजपकडून रणनीती आखली जात आहे. या संदर्भात एनडीएने बोलावलेल्या बैठकीला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) हजेरी लावणार आहेत. दुपारी 1 वाजता ही बैठक सुरू होणार, असून एनडीएचे घटकपक्ष यावेळी उपस्थित राहणार आहेत.

भाजपने झिडकारल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. तसेच एनडीएतून बाहेर पडत आव्हान दिले. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी बंडखोरी करत शिवसेनेला ( Shivsena ) हादरा देत, दिल्ली दरबारी जवळीक वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती ( President ) पदाची निवडणूक जवळ आल्याने एनडीएकडून बैठकांचा जोर वाढवला आहे. देशभरात घटकपक्षांना या बैठकीला बोलावले असून शिंदे गटालाही निमंत्रण देण्यात आले आहे. शिंदे गटाने हे निमंत्रण स्वीकारले असून दीपक केसरकर बैठकीला जाणार आहेत. दुपारी 1 वाजता ही बैठक सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते आहे.

CM Eknath Shinde

उद्धव ठाकरे यांनी मुर्मु समर्थन दिल्याचे जाहीर - शिवसेना आणि एनडीएचे संबंध ताणले गेले आहेत. शिवसेना राष्ट्रपती पदासाठी कोणाला मतदान करणार यावर साशंकता होती. मात्र, शिवसेनेच्या खासदारांकडून एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुर्मु समर्थन दिल्याचे जाहीर केले आहे. भाजप नव्हे, तर केवळ आदिवासी वर्गाला हा पाठिंबा असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही, संजय राऊत - राष्ट्रपतीपदाचे उमेदवार द्रौपदी मुर्मू ( draupadi murmu ) यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही, अशी भूमिका शिवसेनेचे नेते संजय खासदार यांनी मांडली. खासदारांची मत घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या 18 जुलै रोजी होणार आहे. मातोश्री येथे खासदारांच्या बैठकीतून नाराजीने गेल्याची चर्चा चुकीचे असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव नसल्याचेही त्यांनी सांगितले.

देशात विरोधी पक्ष टिकला पाहिजे - मागच्या काही दिवसातील आपण घडामोडी पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की हे सर्व विरोधी पक्ष संपवण्याचा षड्यंत्र सुरू आहे. देशात विरोधी पक्ष टिकला पाहिजे. यशवंत सिन्हा यांनाही आमच्या सद्भावना आहेत. लोक भावना काय आहे यानुसार निर्णय घ्यावा लागतो. यापूर्वी आम्ही प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी आम्ही एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नव्हता. एनडीएत असताना प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता. शिवसेनेला असे निर्णय घेण्याची परंपरा आहे."

पहिल्या आदिवासी समाजातील राष्ट्रपती - यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "सोमवारी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भात आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत ते सर्व सदस्यांची मत जाणून घेत असतात आणि त्यानंतरच आपला निर्णय घेत असतात. द्रौपदी मुर्मु या पहिल्या आदिवासी समाजातील राष्ट्रपती पदाच्या उमेदवार आहेत. आदिवासी क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत कार्यरत आहेत. राजकारणात देखील अनेक आदिवासी समाजाचे नेते कार्यकर्ते सक्रिय आहेत."

म्हणजे भाजपला पाठिंबा नाही - पुढं बोलताना राऊत म्हणाले की, "द्रोपती मुर्मु यांच्या बद्दल आमच्या कालच्या बैठकीत चर्चा झाली. प्रत्येकाच मत आम्ही समजून घेतल आहे. द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही. शिवसेनेची भूमिका एक ते दोन दिवसात स्पष्ट होईल. या बाबत जो काही निर्णय असेल तो आमचे पक्ष प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे जाहीर करतील." अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

हेही वाचा - Maharashtra and India Rain Update : महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊ, पाहा या ठिकाणांची परिस्थिती!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.