ETV Bharat / city

मुंबई: कोविन ऍपमधील तांत्रिक अडचणींचा लसीकरणाला फटका - मुंबईत 9 केंद्रांवर कोरोना लसीकरण

मुंबईतील 9 लसीकरण केंद्रांवर 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पण कोविन ऍपमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने दोन दिवस लसीकरण बंद ठेवल्यानंतर सोमवारपासून पुन्हा लसीकरण सुरू झाले. मात्र कोविन ऍपमधील तांत्रिक अडचणी काही दूर होताना दिसत नाहीयेत, तर दुसरीकडे अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीची भीती वाटत असल्याचे समोर आले आहे.

कोविन ऍपमधील तांत्रिक अडचणींचा लसीकरणाला फटका

author img

By

Published : Jan 20, 2021, 9:45 PM IST

मुंबई - मुंबईतील 9 लसीकरण केंद्रांवर 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पण कोविन ऍपमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने दोन दिवस लसीकरण बंद ठेवल्यानंतर सोमवारपासून पुन्हा लसीकरण सुरू झाले. मात्र कोविन ऍपमधील तांत्रिक अडचणी काही दूर होताना दिसत नाहीयेत, तर दुसरीकडे अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीची भीती वाटत असल्याचे समोर आले आहे. परिणामी लसीकरण कमी होत असून, याचा फटका बीकेसी कोविड सेंटरमधील लसीकरण मोहिमेला बसला आहे.

कोविन ऍपवर नोंदणी बंधनकारक

पहिल्या टप्प्यात 1 लाख 30 हजार कोरोना योद्ध्यांना अर्थात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. यासाठी 9 केंद्र तयार करण्यात आले आहेत. मात्र कोरोना लसीचे काही दुष्परिणाम समोर आल्याने, आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. तसेच कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून कोविन ऍपवर नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.अशावेळी पहिल्याच दिवशी कोविन ऍपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे पहिल्याच दिवशी पुढील दोन दिवसासाठी मुंबईतीलच नव्हे तर राज्यातील लसीकरण बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली होती.

कोविन ऍपमधील अडचणी अद्याप कायम

कोविन ऍपमधील सर्व अडचणी दूर झाल्याचे म्हणत सोमवारपासून पुन्हा लसीकरण सुरू करण्यात आले खरे, पण प्रत्यक्षात मात्र या अडचणी दूरच झालेल्या नाहीत. ऍपमध्ये नोंदणीच होत नसल्याचे चित्र आहे. सर्वच लसीकरण केंद्रात ही अडचण येत असून, याचा लसीकरण मोहिमेवर मोठा परिणाम होत आहे.

मंगळवारी 145 तर बुधवारी 135 जणांचे लसीकरण

बीकेसी कोविड सेंटरने दिवसाला 500 जणांचे लसीकरण करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. पण पहिल्या दिवसापासूनच हे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळेच पहिल्या दिवशी 220 तर काल 145 आणि आज 135 जणांचे लसीकरण झाले आहे. तर आज केवळ नोंदणी होऊ न शकल्याने 80 जण परत गेले आहेत. तर काहीजण लसीकरणाची भीती वाटत असल्यामुळे आले नसल्याचे समोर आले आहे, याबाबत बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ राजेश डेरे यांना विचारले असता त्यांनी लसीकरण कमी होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर लसीच्या भीतीमुळे थोडाफार परिणाम होत आहे. पण मुळात कोविन ऍपमध्ये अडचणी असल्यानेच लसीकरण कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.