ETV Bharat / city

Paramvir Singh absconding case Decision: फरार घोषित केलेला अर्ज रद्द करण्यात यावा परमबीर सिंग याच्या याचिकेवर आज निर्णय - फरार घोषित केलेला आदेश

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर (One hundred crore recovery case) शंभर कोटीच्या वसुलीचा आरोप केल्याच्या प्रकरणाचा नंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग तब्बल 231 दिवसानंतर मुंबईत दाखल झाले. सिंग यांच्या वकिलाकडून न्यायालयात (Declared absconding) फरार घोषित केलेला आदेश रद्द करण्यात यावा याकरिता अर्ज करण्यात आला आहे. (petition of Paramvir Singh) या अर्जावर आज गुरुवारी महानगर दंडाधिकारी न्यायालय निर्णय देणार आहे.

Paramvir Singh
परमवीर सिंग
author img

By

Published : Dec 2, 2021, 12:19 PM IST

मुंबई: परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांच्या माध्यमातून खंडणी वसुली केली अशी तक्रार गोरेगावातील एका व्यावसायिकाने केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचने परमबीर सिंह यांच्या नावे समन्स बजावला होता. पण अनेक समन्सला कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर किला कोर्टाकडून परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले. या याचिकेवर आज न्यायालय निर्णय देणार आहे.

असे आहे प्रकरण
परमबीर सिंग यांना गुन्हे शाखेने नोटीस पाठवून १२ ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. यानंतर आता गुन्हे शाखेने सिंग यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटसाठी अर्ज केला. न्यायालयाने गुन्हेशाखेच्या अर्जावर सुनावणी करताना परमबीर यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं. गोरेगावमधील बिमल अग्रवाल या बिल्डरने ९ लाख रुपयांच्या खंडणीचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. तसेच सचिन वाझेला आतापर्यंत एकूण ११ लाख ९२ हजारांचा हप्ता दिल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले होते. परमबीर यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंग ऊर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणात १२ ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सिंग यांना नोटीस बजावण्यात आली होती. तक्रारीनुसार, जानेवारी २०२० ते मार्च २०२१ पर्यंत ९ लाख वसुलीचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

हे ही वाचा : Parambir Singh Case : परमबीर सिंह यांच्या निलंबनाची राज्य सरकारकडून तयारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.