ETV Bharat / city

'एमएमआरडीए'कडून आणखी नव्या 12 मेट्रो गाड्यांची खरेदी करण्याचा निर्णय

author img

By

Published : Nov 25, 2020, 5:12 PM IST

मुंबईतील वाहतूक व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यासाठी, तसेच मेट्रो प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरवण्यासाठी एमएमआरडीएकडून आणखी नव्या 12 मेट्रो गाड्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Purchase of 12 new metros from MMRDA
'एमएमआरडीए'कडून आणखी नव्या 12 मेट्रोंची खरेदी

मुंबई - मुंबईतील वाहतूक व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यासाठी, तसेच मेट्रो प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरवण्यासाठी एमएमआरडीएकडून आणखी नव्या 12 मेट्रो गाड्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील मेट्रो 2 ब (डीएन नगर ते मानखुर्द), मेट्रो 7 अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) आणि मेट्रो 9 (दहिसर ते मिरारोड) या तीन मार्गांसाठी नव्या 12 गाड्या खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे. दुसरीकडे या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून, लवकरच काम पूर्ण होणार असल्याचा विश्वासही एमएमआरडीएच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

विस्तारित मार्गासाठी गाड्याची खरेदी

एमएमआरडीएने दहिसर ते डीएन नगर असा मेट्रो 2 अ प्रकल्प हाती घेतला आहे. तर दहिसर ते अंधेरी पूर्व या मेट्रो 7 मार्गाचे काम देखील वेगात सुरू आहे. हे प्रकल्प 2021मध्ये पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. नागरिकांच्या सोयीसाठी या दोन्ही मार्गांचा विस्तार करण्यात आला आहे. या दोन विस्तारीत मार्गासह मेट्रो 9 मार्गासाठी जो की दहिसर ते मिरारोड असा आहे, या तीन मार्गांसाठी मेट्रो 12 नवीन गाड्या खरेदी करणार आहे.

'या' कंपनीकडून गाड्यांची खरेदी

मेट्रो आणि मोनोसाठी यापूर्वी परदेशातून गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या, मात्र यावेळेला 'मेड इन इंडिया'चा नारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता मेट्रोच्या गाड्या भारतात तयार केल्या जात आहेत. बंगळुरू स्थित भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड या कंपनीकडून गाड्या तयार करून घेतल्या जात आहेत. या कंपनीला 12 मेट्रो गाड्यांचे कंत्राट देण्यात आले आहे.

576 डब्यांचे कत्राट

बंगळुरू स्थित या कंपनीला एमएमआरडीएने या पूर्वी 504 डब्यांच्या निर्मितीचे काम दिले होते. तर आता आणखी 72 डबे वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता या कंपनीला एकूण 576 डब्यांचे कत्राट देण्यात आले आहे. या 576 डब्यांसाठी एमएमआरडीएला 501 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

हेही वाचा - कात्रजजवळ आठ वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात; पाच जखमी

हेही वाचा - विहंग सरनाईकबरोबर आ. प्रताप सरनाईक यांचीही आज चौकशी होण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.