मुंबई - राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी, त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ही घोषणा केली.
हेही वाचा - मावळच्या घटनेला सरकार नाही तर भाजपाच जबाबदार होते - शरद पवार
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
ही मदत खालील प्रमाणे राहील
• जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर.
• बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर.
• बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर.
ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.
हेही वाचा - Cruise Drugs case : क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खानवरील NCBची कार्यवाही संशयास्पद - अॅड. नितीन सातपुते