पणजी : निसर्गातील पर्यावरणीय बदल व जलप्रदूषणाचा फटका समुद्री जीवांना बसत आहे. असाच फटका पणजी शहराला लागून असणाऱ्या मिरामार समुद्रकिनारी भागातील माशांना बसला आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास अनेक मृत माशांचा खच किनाऱ्यावर आढळून आला आहे. पर्यावरणात होणाऱ्या नैसर्गिक बदलामुळे अनेक मासे मृतावस्थेत समुद्रकिनारी आढळून आल्याचे सांगितले जात आहे. या मृत माशांचा खच हा कित्येक मीटर पर्यंत पसरला होता.
मिरामार समुद्रकिनारी मृत माशांचा खच - Dead Fishes seen at Miramar beach
शहरालगत असणाऱ्या मिरामार समुद्रकिनाऱ्यावर अनेक मासे मृतावस्थेत आढळून आले. मांडवी नदीत होणारे प्रदूषण व पर्यावरणीय बदलामुळे हे मासे मृत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिरामार समुद्रकिनारी मृत माशांचा खच