मुंबई - व्यावसायिकाला आयकर विभागाची भीती दाखवत खंडणी मागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात यापूर्वी तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील पसार आरोपी डीसीपी सौरभ त्रिपाठी ( DCP Saurabh Tripathi )यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली, असून अटकपूर्व जामीन अर्ज आज (शनिवार) दाखल ( DCP Saurabh Tripathi runs for pre-arrest bail ) केला आहे. या अर्जावर बुधवारी 23 मार्च रोजी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याशिवाय सौरभ त्रिपाठी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठीचा अहवाल मुंबई पोलीस आयुक्तालयातून गृहविभागात ( Mumbai Police sent proposal to Home Department ) पाठवण्यात आला आहे.
तीन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल -
गडिया व्यवसायिकांकडून खंडणी वसूल प्रकरणात ३ दिवसांपूर्वी सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील फरारी पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. प्राप्तीकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवून अंगडिया व्यवसाय करणाऱ्यांकडून पोलिसांनी खंडणी वसुली केली होती. या प्रकरणी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पैसे उकळल्याप्रकरणी तीन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने मुंबई पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती.
आयपीएस अधिकारी त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल -
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांची बदली करण्यात आली होती. या बदलीनंतर सौरभ त्रिपाठी हे सुटीवर गेले होते. दरम्यान अटक करण्यात आलेले आरोपी ओम वंगाटे यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले गेले होते. त्या वेळी IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे असे तपास अधिकाऱ्यांनी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक परिमंडळ दिलीप सावंत यांनी स्वतः या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर आयपीएस अधिकारी त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तावार्ता पथकाला (सीआययू) वर्ग करण्यात आला होता.
मुंबई पोलिसांनी केली निलंबनाची शिफारस
मुंबई पोलिसांनी सौरभ त्रिपाठी यांचा शोध घेण्यासाठी मुंबईतील त्यांच्या रहात्या घरी तपास केला. उत्तरप्रदेशातील कानपूर आणि लखनऊमध्येही मुंबई पोलिसांनी चौकशी केलीये. पण, त्रिपाठी कुठे आहेत याची माहिती अजूनही मिळालेली नाही. खंडणी प्रकरणी सौरभ त्रिपाठींची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या निलंबनाची शिफारस गृहमंत्रालयाकडे ( Mumbai Police proposes suspension of Saurabh Tripathi ) केली. राज्य सरकारने याबाबत अजून काही ही ठोस निर्णय घेतलेला नाही.
कोण आहेत सौरभ त्रिपाठी? ( Who is DCP Saurabh Tripathi )
सौरभ त्रिपाठी 2010 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी आहेत. सद्यस्थितीत ते मुंबईत पोलीस उपायुक्त ऑपरेशन म्हणून कार्यरत आहेत. सौरभ त्रिपाठी यांना ओळखणारे अधिकारी सांगतात, मुंबईच्या नायर रुग्णालयातून वैद्यकीय शिक्षण (MBBS) पूर्ण केल्यानंतर सौरभ त्रिपाठी IPS बनले. अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, मुंबईत पोलीस उपायुक्त, राज्यपालांचे ADC, मुंबईत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी कर्तव्य बजावले आहे. वरिष्ठ IPS अधिकारी म्हणतात, अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या चौकशीनंतर सौरभ त्रिपाठी चर्चेत आले. कोपर्डी प्रकरणाचा तपास करून त्यांनी आरोपींविरोधात चार्जशीट दाखल केली होती.
काय आहेत आरोप?
पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींविरोधात मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटने काही दिवसांपूर्वीच खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. सौरभ त्रिपाठींवर मुंबईतील अंगडीयांकडून जबरदस्तीने पैसे उकळण्याचा आरोप आहे. अंगडीयांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पोलीस उपायुक्त त्रिपाठी यांनी त्यांच्याकडून काम सुरू ठेवण्यासाठी 10 लाख रूपये मागितल्याचा आरोप आहे.
हेही वाचा - Embarrassing And Shocking : कोवळ्या कळीला बाप,भाऊ, आजोबा मामानेही सहा वर्षे उपभोगले