ETV Bharat / city

Angadiya extortion case : डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचा वॉन्टेड आरोपी म्हणून रिमांड अर्जामध्ये उल्लेख

पोलिसांना वांगटे यांची पोलीस कस्टडी मिळाली होती. मंगळवारी त्यांना किल्ला कोर्टात हजर केले असता त्यांच्या रिमांड अर्जात डीसीपी सौरभ त्रिपाठीचे ( DCP Saurabh Tripathi ) नाव वॉन्टेड आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास क्राइम इंटेलिजन्स युनिट (सीआययू) करत आहे.

crime
गुन्हे
author img

By

Published : Mar 16, 2022, 2:20 PM IST

मुंबई - मुंबई एल.टी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांवर एका व्यवसायकाला आयकर विभागाची भीती दाखवून खंडणी मागण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यातील पोलीस निरीक्षक ओम वांगटे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. तीन मार्च रोजी एल.टी. मार्ग पोलिसांनी त्यास अटक केली होती. त्यावेळी पोलिसांना वांगटे यांची पोलीस कस्टडी मिळाली होती. मंगळवारी त्याला किल्ला कोर्टात हजर केले असता त्याच्या रिमांड अर्जात डीसीपी सौरभ त्रिपाठीचे ( DCP Saurabh Tripathi ) नाव वॉन्टेड आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास क्राइम इंटेलिजन्स युनिट (सीआययू) करत आहे.

हेही वाचा - Awareness In Area : धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज, लोकलमधील प्रवाशांना फुगे न मारण्याचे आवाहन...!

अंगडिया व्यावसायिकाकडून ( Angadiya extortion case ) पैसे उकळल्याच्या आरोपाखाली तीन पोलीस अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर काही दिवसांनी मुंबई पोलिसांनी मंगळवारी विभागीय पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना या प्रकरणात आरोपी केले. या प्रकरणाचा तपास करणार्‍या क्राईम इंटेलिजन्स युनिटने (सीआययू) निरीक्षक ओम वांगटे याला मंगळवारी न्यायालयात हजर केले. रिमांड अर्जात त्रिपाठीचे नाव वॉन्टेड आरोपी म्हणून नमूद करण्यात आले होते.

गुरुवारी अटक करण्यात आलेला वांगटे या प्रकरणात अटक करण्यात झालेला तिसरा आरोपी होता. याआधी पोलिसांनी एपीआय नितीन कदम आणि पीएसआय समाधान जमदाडे या सर्वांना अटक केली होती. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असून वांगटे याच्या पोलीस कोठडीत आणखी 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्रिपाठी यांची डीसीपी ऑपरेशन्स या पदावर बदली करण्यात आली होती. मात्र, त्रिपाठी तेव्हापासून रजेवर गेले असून, अद्याप त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अंगडिया असोसिएशनने त्यांच्या तक्रारीत दावा केला आहे की, अटक केलेल्या अधिकार्‍यांनी डिसेंबर महिन्यात अनेक वेळा काही अंगडियांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची किंवा आयकर विभागाला माहिती देण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 18-20 लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळली. या प्रकरणाची अंगडिया असोसिएशनकडून डीसीपी सौरभ त्रिपाठी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र त्यांनी या तक्रारींची दखल घेतली नव्हती. त्यानंतर अंगडिया असोसिएशनकडून माजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्याकडे चौकशी देण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तवार्ता पथकाला वर्ग करण्यात आला होता.

हेही वाचा - Mumbai Police : पोलिसांनी खाजगी वाहनावर 'पोलीस' पाटी लावल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.