ETV Bharat / city

Devendra Fadnavis : विधानसभा अध्यक्षपदाचा पेपर सोप्पा, बहुमत चाचणीचं काय?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

author img

By

Published : Jul 3, 2022, 7:07 PM IST

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. त्यानंतर सोमवारी बहुमत चाचणी पार पडणार आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा प्रस्ताव आम्ही बहुमताने पारित करू, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली ( Devendra Fadnavis On Vidhan Sabha Floor Test ) आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) व भाजपसाठी आज ( 3 जुलै ) विधानसभेत विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा पहिला पेपर होता. तो पेपर त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये व्यवस्थितपणे पार पडला आहे. कारण विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar ) हे आज विराजमान झाले आहेत. परंतु, आता दुसरी महत्त्वाची लढाई उद्या ( 4 जुलै ) बाकी असून, विश्वास दर्शक ठरावाला शिंदे-फडणवीस सरकारला सामोरे जायचं आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

'आम्ही बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकू' - देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत १६४ आमदार आमच्या बाजूने होते. आमचे लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक हे दोन आमदार आजारी असल्याकारणाने ते आज अनुपस्थित राहिले. आमच्याकडे १६६ आमदारांचा पूर्ण पाठिंबा आहे. उद्या विश्वास मताचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा प्रस्ताव आम्ही बहुमताने पारित करू, असा विश्वास उपमुख्यत्र्यांनी व्यक्त केला ( Devendra Fadnavis On Vidhan Sabha Floor Test ) आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

'युवा अध्यक्ष महाराष्ट्राला प्राप्त' - नवनिर्वाचित अध्यक्षांबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, राहुल नार्वेकर हे कायदेतज्ञ आहेत. एक युवा तरुण अध्यक्ष महाराष्ट्राला प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात नाही तर देशातील ते पहिले विधानसभेचे युवा अध्यक्ष आहेत, असे कौतुक उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नार्वेकर यांचं केलं आहे.

हेही वाचा - Assembly Speaker Election : 'शिवसेनेच्या बंडखोर 39 आमदारांना निलंबित करा; विधानसभा अध्यक्षांना पत्र'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.