ETV Bharat / city

'डी' कंपनीचा खंडणी वसूलीसाठी नवा फंडा, व्हॉट्सअपवर व्हॉईस रेकॉर्डिंग करुन मागतायत खंडणी

रिजवान भारतातून दुबईला पळण्याच्या बेतात होता. मात्र, त्याला पोलिसांनी विमानतळावरुन अटक करण्यात आलेली आहे.

रिजवान कासकर
author img

By

Published : Jul 18, 2019, 8:59 PM IST

मुंबई - अंडरवर्ल्डमध्ये आता काम करण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी दाऊदची गँग एखाद्याला फोन करुन धमकी देत असत. मात्र, आता ते व्हॉट्सअॅपवर व्हॉइस रेकॉर्डिंग करुन समोरच्याला धमकावत आहेत. असेच एक प्रकरण मुंबई पोलिसांसमोर आलेले आहे. याप्रकरणी दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिजवान कासकर याला अटक करण्यात आलेली आहे.

पोलिसांकडे तक्रार करणारी व्यक्ती आणि आरोपी टॉवेलवाला दोघेही व्यावसायिक पार्टनर होते. हे दोघे चीनवरुन मुंबईत अनधिकृत माल मागवायचे. दोघांमध्ये एक व्यवहार झाला, त्याप्रकरणी तक्रारदाराकडून १५ लाख ५० हजार रुपये उकळण्याचा बेत होता. पैसे उकळण्याचा नादात टॉवेलवाला अहमद वधारियाच्या मार्फत रिझवानकडे गेला. त्याने फईम मचमचशी संपर्क घडवून दिला आणि मचमचने व्यावसायिकाला एक ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवून पैसे मागू नये म्हणून धमकावले. यानंतर व्यावसायिकाने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी रिजवानसह त्याच्या २ साथीदारांना अटक केली. आज त्यांना किला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. मात्र न्यायालयात आरोपीच्या वकिलांनी हे प्रकरण खंडणीचे नसून सिव्हील मॅटर आहे, असा युक्तिवाद केला.

रिजवान भारतातून दुबईला पळण्याच्या बेतात होता. मात्र, त्याला पोलिसांनी विमानतळावरुन अटक करण्यात आलेली आहे. आता या प्रकरणात मुंबई पोलीस वेगळ्या पद्धतीनेही तपास करणार आहे. रिजवानकडे जो बनावट पासपोर्ट सापडला, तो शेख या नावाने बनवण्यात आला आहे. सोबतच अश्फाक टॉवेलवाला याच्याकडे सुद्धा २ बनावट पासपोर्ट सापडल्यामुळे त्यांनी अजून कोणाला खंडणीसाठी धमकावले आहे का, याचा तपास सुरू आहे. या अटकेमुळे पुन्हा एकदा दाऊदची फॅमिली गुन्हेगारी जगतात सक्रिय होत आहे का? याचा तपास सुरू आहे.

दुबईत बसून मुंबईतल्या व्यापाऱ्यांकडून वसूल केली जाते खंडणी..

अँकर - अंडरवर्ल्ड मध्ये आता काम करण्याची पद्धत  बदलत चालली आहे. पूर्वी जी दारूची  गॅंग एखाद्याला फोन करून धमकावले जात असत, परंतु आता त्यांची पद्धत बदललेली आहे. ते सध्या व्हाट्सअप वर व्हॉइस रेकॉर्डिंग करून समोरच्याला धमकावत आहेत असंच एक प्रकरण सध्या खंडणी विरोधात कक्षासमोर आलेले आहे. याप्रकरणी दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिजवान कासकर याला अटक करण्यात आलेली आहे

विवो 1 - किला कोर्टासमोर हजर करत असलेले आरोपी रिजवान कासकर व त्याचे दोन सोबती आहेत .यांच्यावर आरोप आहे एका व्यापाऱ्याला फईम मचमच मार्फत धमकावण्याबद्दल.. त्याच्यात मुख्य आरोपी आहे तो दाउदचा पुतण्या रिजवान कासकर आहे तो भारतातून दुबईला पळण्याच्या बेतात होता त्याला पोलिसांनी एअरपोर्टवरून अटक करण्यात आलेली आहे.

बाईट: दत्ता नलावडे डीसीपी क्राईम

विवो 2 - पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या व्यक्ती आणि आरोपी टॉवेलवाला दोघेही व्यवसायिक पार्टनर होते. हे दोघे चायना वरून मुंबईत अनधिकृत माल मागवायचे.दोघांमध्ये एक व्यवहार झाला त्याप्रकरणी तक्रारदाराकडून 15 लाख 50 हजार रुपये उकळण्याचा बेत होता..पैसे उकळण्याचा नादात टॉवेलवाला अहमद वधारीयाच्या मार्फत रिझवान कासकरकडे गेला .त्याने फईम मचमचशी कॉन्टॅक्ट घडवून दिला. आणि फईम मचमचने व्यवसायीकला एक ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवून पैसे मागू नये म्हणून धमकावले.. यानंतर व्यावसायिकाने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.मात्र कोर्टात आरोपीच्या वकिलांनी हे प्रकरण खंडणीचे नसून सिव्हिल मॅटर आहे असा युक्तिवाद केला आहे....

बाईट -              इंगवले       ,आरोपीचे वकील

व्हीव्हो 3 - आता या प्रकरणात मुंबई पोलीस वेगळ्या पद्धतीनेही तपास करणार आहे...आरोपी रिझवान कासकर कडे बनावट पासपोर्ट सापडला असून तो शेख या नावाने बनवण्यात आला आहे. सोबतच अश्फाक टॉवेलवाला याच्याकडेसुधा दोन बनावट पासपोर्ट सापडले. असल्याने यांनी अजून कोणाला खंडणीसाठी धमकावले आहे का याचासुद्धा तपास सुरू आहे..या अटकेमुळे पुन्हा एकदा दाऊदची फॅमिली गुन्हेगारी जगतात पुन्हा सक्रिय होत आहे का याचा तपास सुरू आहे....

पीटीसी - अल्पेश करकरे पी टू सी

व्हिज्युअल, बाईट कॅमेरा मॅन ने लाइव्ह 07 वरून पाठवलंय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.