ETV Bharat / city

राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी अजून आठ दिवस थांबावे - दादा भुसे

जोपर्यंत 80 ते 100 टक्के पाऊस पडत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वाट पाहावी. ज्या तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्या तालुक्यात पेरणी केल्यास दोबर पेरणीचे संकट येण्याची शक्यता, यावेळी दादा भुसे यांनी वर्तवली आहे.

दादा
दादा
author img

By

Published : Jun 23, 2021, 10:31 PM IST

मुंबई - राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज हवामानाचा अंदाज घेण्यात आला आहे. यात अजून आठ दिवस शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले आहे. राज्यात अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. जोपर्यंत 80 ते 100 टक्के पाऊस पडत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वाट पाहावी. ज्या तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्या तालुक्यात पेरणी केल्यास दोबर पेरणीचे संकट येण्याची शक्यता, यावेळी दादा भुसे यांनी वर्तवली आहे.

कृषी मंत्री दादा भुसे
कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस?

सरासरी 25 टक्क्यांहून कमी पाऊस झालेला एकमेव जिल्हा नंदुरबार आहे. तर 25 ते 50 टक्के दरम्यान सरासरी पाऊस झालेला एकही जिल्हा नाही. तसेच 50 ते 75 टक्के सरासरी पाऊस नाशिक, धुळे आणि अकोला या जिल्ह्यात झाला आहे. 75 ते 100 टक्के सरासरी पाऊस जळगाव, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात झाला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात 100 टक्क्यांहून अधिक पाऊस झालेला आहे. राज्यात 14 तालुके असे आहेत, ज्यामध्ये 25 टक्क्यांहून कमी पाऊस पडलेला आहे. तर 14 तालुके असे आहेत ज्यामध्ये 25 ते 50 टक्क्यांदरम्यान आतापर्यंत पाऊस झालेला आहे. तर 35 तालुके असे आहेत, ज्यामध्ये 50 ते 75 टक्क्यांदरम्यान पाऊस पडला आहे. तर 58 तालुक्यात 75 ते 100 टक्के दरम्यान पाऊस पडलेला आहे. यासोबतच 213 तालुक्यात सरासरी 100 टक्क्यांहून अधिक पाऊस पडला असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.