मुंबई - राज्याचा सातत्याने असमतोल विकास होत आला आहे. राज्याचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असल्यास सर्व विभागांचा समान विकास करावा लागेल. असे केले तरच राज्याचा विकास खऱ्या अर्थाने होऊ शकतो, असे मत राज्याचे माजी मुख्य सचिव द. मा. सुकथनकर यांनी व्यक्त केले आहे. एकात्म प्रबोध मंडळाच्यावतीने "महाराष्ट्राच्या विकासाची दिशा व रूपरेषा" या नाना लेले आणि राजेंद्र कोप्पीकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन द. मा. सुकथनकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.
हेही वाचा - मुंबईत अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या कॉल सेंटरवर पोलिसांची कारवाई
यावेळी बोलताना, पश्चिम महाराष्ट्राचा विकास विदर्भ आणि मराठवड्यापेक्षा कसा जास्त झाला हे त्यांनी सांगितले. राज्याचा किंवा देशाचा विकास करताना सर्व वर्गाचा भौगोलिक, आर्थिक विकास करणारा आणि उभारी देणारा असावा, असे त्यांनी स्पष्ट केले. योजना करणाऱ्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याची गरज असल्याचेही सुकथनकर म्हणाले. विकास करताना सर्वाना समान संधी मिळाली तरच खऱ्या अर्थाने विकास होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने विकास करताना महाराष्ट्राच्या विकासाची दिशा व रूपरेषा" या पुस्तकाचा संदर्भ घ्यावा, असे आवाहन सुकथनकर यांनी केले.
मी राज्याचा मुख्य सचिव होतो त्यावेळी पर्यावरण हे नावही ऐकले नव्हते. मात्र, सध्या पर्यावरण हा विषय पुढे आला आहे. यामुळे विकास करताना पर्यावरण, समुद्र पाण्याची उंची, ग्लोबल वॉर्मिंग याचा विचारही करण्याची गरज आहे. राज्याचा आर्थिक आराखडा असावा असे सुकथनकर म्हणाले.