मुंबई - महाराष्ट्रावर ओढावलेल्या महापुराच्या संकटानंतर पूरग्रस्त नागरिकांना विविध माध्यमातून मदतीचा ओघ सुरू झाला. मात्र याचाच फायदा आता सायबर भामटे घेऊ लागल्याचे सायबर पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळेच, पूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी संबधित मदत खरचं केली जात आहे का, याची काळजी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा - BBD Chawl Redelopment - बीडीडी चाळीतल्या रहिवाश्यांचे स्वप्न साकार, लवकरच होणार पुनर्विकास
कोरोना काळात मदतीसाठी अनेक ग्रुप सक्रीय झाले होते. या ग्रुपमध्ये कोरोना रुग्णांना हव्या असलेल्या मदतीसह त्यांची माहिती शेअर केली जात आहे. काहींना ऑक्सिजन सिलेंडर, प्लाझ्मा तर काहींना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज पडत आहे. मात्र, सायबर गुन्हेगार याच माहितीच्या आधारे रुग्णांना लूटत होते. सायबर पोलिसांनी अशा भुरट्या चोरांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली, मात्र असे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. सतत येत असलेल्या या फसवणुकीच्या तक्रारींमुळे सायबर एक्सपर्ट्सने सल्ला दिला आहे की, रुग्णाच्या नातेवाईकांनी माहिती शेअर करताना सावध राहावे आणि डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नये.
नुकतेच महाराष्ट्रातल्या कोकण आणि पश्चिम परिसरात आलेल्या ओल्या दुष्काळामुळे हजारो कुटुंब उदध्वस्त झाली आहेत. या कुटुंबीयाना मदतीसाठी आता संस्थांनी मदत सुरू केली आहे. मात्र याचाच फायदा आता सायबर चोरटेही घेत असल्याचे सायबर पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. हे भामटे खोट्या सामाजिक संस्था बनवून पूरग्रस्तांना मदत करत असल्याचे सांगून अवैधरित्य पैसे उकळत आहेत. तसेच, सामाजिक संस्थेचे बँक खाते असल्याचे सांगून वैयक्तिक खात्यावर पैसे जमा करून घेत आहेत. अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
सोशल मिडियावर प्राप्त झालेल्या या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. देणगी देण्यापूर्वी संबधित सामाजिक संस्था अधिकृत आहे का, हे पडताळून घ्या, देणगी देण्यापूर्वी ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणारी प्रणाली अधिकृत असल्याची खात्री करून घ्या. आपली फसवणूक झाली असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा. तसेच, www.cybercrime.gov.in या संकेत स्थळावर तक्रार नोंदवा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
कशी होते फसवणूक ?
- सोशल मीडियावर सामाजिक संस्थेची खोटी प्रोफाईल बनवली जात आहे. आणि आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले जात आहे.
- खोट्या प्रोफाईलवर बँक खात्याची ऑनलाईन लिंक देऊन त्यावर फक्त ऑनलाईन पेमेंट स्विकारले जात आहेत.
- तर काही भामटे मोबाईलवर थेट लिंक पाठवून त्यावर पर्सनल डिटेल्स भरण्यास सांगून डेटा चोरी करून अकाउंट रिकामे करत आहेत.
हेही वाचा - राज्यात ६ हजार ४७९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, १५७ रुग्णांचा मृत्यू