मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हावडा जाणारी दुरांतो एक्सप्रेस जी सायंकाळी सव्वा पाच (5:15) वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटते. ती काही तांत्रिक कारणामुळे आज गुरुवार (दि. 28 जुलै)रोजी ही गाडी उशिराने धावणार आहे. ती रात्री साधारणता: नऊ वाजून 40 मिनिटांनी हावडासाठी रवाना होणार आहे.
मध्य रेल्वे मंडळाकडून कळवण्यात आले - मुंबई ते हावडा दुरांतो एक्सप्रेस ही नेहमी सायंकाळी सव्वा पाच (5:15) वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटते पण आज काही तांत्रिक कारणामुळे ही गाडी उशिरा धावणार असल्याचे मध्य रेल्वे मंडळाकडून कळवण्यात आले आहे.
रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी धावणार - तब्बल सव्वाचार तास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हावडा दुरांतो एक्सप्रेस आपल्या रोजच्या 5:15 म्हणजेच सायंकाळी सव्वा पाच वाजता ऐवजी सव्वा चार तास उशिराने म्हणजेच रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी धावणार आहे, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एके सिंग यांनी ईटीव्ही भारतला दिली.
हेही वाचा - राज्य सरकारला 'सर्वोच्च' निकालाचा धक्का; ओबीसी आरक्षणाविना होणार 'या' 92 नगरपरिषदांच्या निवडणुका