मुंबई - पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर ( Inflation After Five State Election ) महागाईची झळ पुन्हा एकदा सामान्य नागरिकांना बसायला सुरवात झाली आहे. युक्रेन आणि रशियाच्या ( Russia UKraine War ) सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता आपल्या देशाच्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहचल्या आहेत. आठ दिवसात सात वेळा इंधन दरवाढ ( Crude Oil Price Hike ) झाल्याने सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. आजपासून देशभरात इंधनाचे दर वाढले असून, आजपासून पेट्रोलवर 32 पैसे, तर डिझेलवर 37 पैशाची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या पेट्रोल 114.19 रुपये प्रति लीटर, तर डिझेल 98.50 रुपये प्रति लीटर मिळणार आहे. त्यामुळे वाढत्या इंधन दरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन - पाच राज्याच्या निवडणुकांनंतर केंद्र सरकारने महागाईचा भडका उडवून दिला आहे. याविरोधात काँग्रेस देशभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलने करणार आहे. 31 मार्चला कॉंग्रेस कडून हे आंदोलन करण्यात येणार आहे. देशामध्ये निवडणूक असल्यास केंद्र सरकार महागाई करत नाही. मात्र, निवडणुका होताच महागाई करण्यास मोदी सरकारने सुरु केल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातो आहे.
हेही वाचा - Police And Warkari Clash Kolhapur : नंदवाळमध्ये रिंगण सोहळ्यावरुन पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की