ETV Bharat / city

Gudi Padwa 2022 : गुढीपाढव्यानिमित्त बाजारपेठा सजल्या; दोन वर्षानंतर जल्लोषात साजरा होणार उत्सव - गुढीपाढवा मुंबई बाजारपेठा सजल्या

यंदा गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) मुंबईमध्ये बाजारपेठा सजल्या (Mumbai Market) आहेत. गुढीचे साहित्य नवी काठी, यासह पाडव्यासाठी नवीन उत्पादने खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या  सावटानंतर २ वर्षानंतर यंदा प्रथमच गुढीसाठी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह दिसत आहे.

Gudi padwa 2022
गुढीपाढव्यानिमित्ताने मुंबई बाजारपेठा सजल्या
author img

By

Published : Mar 31, 2022, 4:41 PM IST

Updated : Mar 31, 2022, 6:38 PM IST

मुंबई - साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा (Gudi Padwa). यंदा गुढीपाडव्यानिमित्त मुंबईमध्ये बाजारपेठा सजल्या (Mumbai Market) आहेत. गुढीचे साहित्य नवी काठी, यासह पाडव्यासाठी नवीन उत्पादने खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या सावटानंतर २ वर्षानंतर यंदा प्रथमच गुढीसाठी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह दिसत आहे. लालबाग, परळ येथील दुकानांमध्ये नववर्षानिमित्त निघणाऱ्या शोभायात्रांमध्ये दिसणारे साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसत आहे. तसेच मुंबई- शिर्डी रामनवमीनिमित्त निघणाऱ्या पदयात्रेनिमित्तसुद्धा सामान खरेदीसाठी दुकानात गर्दी झाली आहे.

गुढीपाढव्यानिमित्ताने बाजारपेठा सजल्या

२ वर्षानंतर गुढीपाडवा जल्लोषात - यंदा गुढीपाडव्यानिमित्त निघणार्‍या शोभायात्रेला सरकार परवानगी देणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम असला तरी नागरिकांनी मात्र याची पूर्ण तयारी केली आहे. मुंबईतील गिरगाव, परल, लालबाग या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुढीपाढव्यानिमित्त शोभायात्रा मिरवणुका काढल्या जातात. यामध्ये हजारोंच्या संख्येने जनता सामील होते. रंगबेरंगी पोशाख, ढोल-ताशांच्या गजरामध्ये चित्ररथाच्या स्वरूपात या मिरवणुका निघत असतात. या मिरवणुकांमध्ये भाग घेणारे हे लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत असतात. गिरगावमध्येसुद्धा जी शोभायात्रा काढली जाते ती मुंबईची सर्वात मोठी शोभायात्रा असते. यामध्ये निरनिराळे पोषाख परिधान करून पर्यावरण, पौराणिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक विषयावर आधारित चित्र रथामध्ये जनता नवीन पोषाखाद्वारे सामील होते. म्हणून या कपड्यांच्या खरेदीसाठी सुद्धा आता दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी दोन वर्षानंतर वाढलेली आहे.

गिरगावात रंगणार शोभायात्रा सोहळा - हिंदू नववर्षाच्या स्वागत सोहळा अर्थात मराठी संस्कृतीचा ठेवा हा गुढीपाडवा निमित्त भव्य मिरवणूक व आकर्षक स्वरूपात साजरा करण्याची प्रथा आहे. गिरगावात सुद्धा गिरगाव ठाकूरद्वार चिराबाजार या मार्गावरून प्रिन्सेस स्ट्रीट पर्यंत मिरवणूक जाणार आहे. या सोहळ्यामध्ये दक्षिण मुंबईतील पंधरा आकर्षक चित्ररथ सहभागी होणार असून यामध्ये मुंबई महानगरपालिका देशातील आदर्श महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार देशात अव्वल क्रमांकाचे सरकार, तसेच पर्यावरण, पौराणिक, ऐतिहासिक, संस्कृती विषयावर आधारित विविध चित्ररथ सहभागी होणार आहेत. तसेच मुंबईकरांना वेध लागलेल्या गिरगावकर यांची अस्मिता असलेल्या उत्सवामध्ये गिरगावातील सुप्रसिद्ध जगदंब ढोल पथक, मुंबईतील डबेवाल्यांचा डबेवाला भवन व त्यांची पारंपरिक दिंडी १५१ महिला बाईक १६ पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार असून मल्लखांब खेळाचे प्रात्यक्षिक, भारतातील संगीतातील अनमोल रत्न भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर आधारीत चित्ररथ सुद्धा येथे बघायला भेटणार आहे. फक्त गिरगावंच नाही तर मुंबई उपनगरा मध्ये अशा पद्धतीने ४०० च्या वर शोभायात्रा काढल्या जातात. या शोभायात्रे मध्ये दिसणारे हे पोशाख, फेटे, सदरे याची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये यंदा वाढल्याने दोन वर्षानंतर हा सण साजरा होत असल्याने या साहित्याचे व्यवसाय करणारे व्यवसायिकसुद्धा यंदा आनंदात आहेत.

यंदा रामनवमी निमित्त मुंबई-शिर्डी पदयात्राही सुरू - हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यानिमित्त होत असताना त्याचसोबत येणाऱ्या राम नवमीसाठीसुद्धा मुंबईतून शेकडोंच्या संख्येने पदयात्रा करत साई पालखीसुद्धा मुंबई ते शिर्डी रवाना होत असतात. या पालखीसाठीसुद्धा लागणारे साहित्य हे मोठ्या प्रमाणामध्ये यंदा खरेदी केले जात आहे. कारण मागील दोन वर्षांमध्ये या पदयात्रा पालख्या ही बंद झाल्या होत्या. परंतु आता यांना परवानगी देण्यात आली असल्याने मुंबई तसेच मुंबई उपनगर, ठाणे या परिसरातून शेकडोच्या संख्येने १० दिवसांची पदयात्रा करत या पालख्या रामनवमीच्या दिवशी शिर्डीमध्ये दाखल होणार आहेत. यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य खरेदी केले जात आहे. आणि म्हणूनच यंदा नववर्षाची सुरुवात करत असताना या निमित्त कापड असेल पोशाख असतील विविध वस्तू असतील याची खरेदी सुद्धा वाढू लागली आहे. एकंदरीत महागाईने उच्चांक गाठला असताना या वस्तू सुद्धा महाग झालेल्या आहेत. परंतु मागील दोन वर्षापासून या उत्सवापासून दूर राहिलेली जनता ही सणावाराला या महागाई कडे दुर्लक्ष करून या सणाचा आनंद घेण्यामध्ये जास्त मग्न झालेली दिसत आहे.

Last Updated : Mar 31, 2022, 6:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.