ETV Bharat / city

धक्कादायक..! कोरोना काळात मुंबईत गुन्हेगारी वाढली - Mumbai Crime news

कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये मुंबई शहरामध्ये 2019 या वर्षाच्या तुलनेत 2020 मध्ये गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे.

Crime increased in Mumbai as a compared to 2019
धक्कादायक..! कोरोना काळात मुंबईत गुन्हेगारी वाढली
author img

By

Published : Jan 17, 2021, 7:27 AM IST

Updated : Jan 18, 2021, 2:23 PM IST

मुंबई - 2020 हे वर्ष कोरोना संक्रमणामुळे सर्वांसाठी आव्हानात्मक ठरले. देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र, या कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये मुंबई शहरामध्ये 2019 या वर्षाच्या तुलनेत 2020 मध्ये गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे.

कोरोना काळात मुंबईत गुन्हेगारी वाढली
2020 मध्ये मुंबई शहरामध्ये एकूण 136 खुनाचे गुन्हे घडले आहेत. खुनाच्या प्रयत्नाचे 321 गुन्हे घडले असून दरोड्याच्या 557 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. खंडणीच्या 179 गुन्ह्यांची नोंद मुंबईतल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आलेली आहे. घरफोडीचे 1499 गुन्हे तर चोरीचे 3036 गुन्हे मुंबई शहरात 2020 या वर्षामध्ये नोंदविण्यात आलेले आहेत. वाहन चोरीचे तब्बल 2557 गुन्हे घडले असून जखमी करण्याचे 3416 गुन्हे, दंगलीचे 291, बलात्काराचे 693 , विनयभंगाचे 1772 तर इतर प्रकरणांमध्ये तब्बल 33147 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे.
2020 च्या तुलनेत 2019 च्या क्राईम रेकॉर्ड वर नजर टाकली असता मुंबई शहरात 2019 मध्ये खुणाचे 150 गुन्हे घडले असून खूणाच्या प्रयत्नाचे 306 गुन्हे, दरोड्याचे 892 गुन्हे, खंडणीचे 221, घरफोडीचे 1889 गुन्हे, चोरीचे 5347 तर वाहन चोरीचे 2438 गुन्हे घडले आहेत. जखमी करण्याचे 4400 गुन्हे घडले असून दंगलीचे 342, बलात्काराचे 913 तर विनयभंगाचे 2393 गुन्हे घडले आहेत. इतर प्रकरणांमध्ये तब्बल 17521 गुन्ह्यांची नोंद 2019 या वर्षामध्ये करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलींवर बलात्कार व अपहरणाचे गुन्हे वाढले
मुंबई शहरात 2020 मध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याच्या 400 घटना घडल्या असून महिलांवर बलात्कार होण्याच्या 293 गुणांची नोंद करण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या 708 गुन्हे मुंबईत घडले असून महिलांवरील विविध अत्याचाराच्या तब्बल 4100 गुन्ह्यांची नोंद मुंबईतल्या 94 पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आलेली आहे.

Last Updated : Jan 18, 2021, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.